Download App

Parineeti Chopra: राघव चड्ढाच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीची खास पोस्ट; म्हणाली, देवाने मला…’

Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लग्नामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राघव चड्ढा (Raghav Chadha Birthday) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राघव यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीने खास पोस्ट लिहिली आहे.


परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालतंय आहेत. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांची ही पहिली दिवाळी असणार आहे. लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण साजरा करण्यासाठी दोघे देखील खूपच उत्सुक झाले आहेत. दिवाळीतमध्ये राघव चड्ढा यांचा वाढदिवस आला आहे.

राघव चड्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने दोघांचे एक रोमँटिक अंदाजामधील फोटो पोस्ट केला आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लग्नानंतर फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी हे फोटो क्लिक केले आहे, जे अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

… म्हणून Nargis Fakhri म्हणते, रॉकस्टार खास होता

परिणीतीने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, देवाने मला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तू आहेस. तुझं मन आणि बुद्धी मला हैराण करते. तुझा प्रामाणिकपणा आणि विश्वास, एक चांगला व्यक्ती म्हणून असलेलं तुझं कर्तृत्व मला खरचं खूप प्रेरणा देणारे असणार आहे. आज अधिकृतरित्या माझा आवडता दिवस आहे. माझ्यासाठी आजचा तुझा जन्म झालेला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा…आणि माझी निवड केल्याबद्दल खूप-खूप आभार”. परिणीतीने रोमँटिक फोटो पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. परी एका मेसेजच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. परीची ही पोस्ट चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते खूपच शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे बघायला मिळत आहेत.

Tags

follow us