… म्हणून Nargis Fakhri म्हणते, रॉकस्टार खास होता

… म्हणून Nargis Fakhri म्हणते, रॉकस्टार खास होता

Nargis Fakhri : अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र 12 वर्षांपुर्वी आलेला तिचा रॉकस्टार हा चित्रपट मात्र आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खास आहे. आज या चित्रपटाला 12 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त तिने आपल्या या चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

MNS News : ‘हिंमत असेल तर मराठी माणसाला पंतप्रधान करा’; मनसेचा भाजपला थेट चॅलेंज!

रॉकस्टारच्या 12 वर्षाच्या खास प्रवासवर नर्गिस म्हणते, रॉकस्टार तिच्यासाठी खास होता. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी अभिनीत ‘रॉकस्टार’ या अनोख्या चित्रपटाला आज तब्बल 12 वर्ष झाली आहेत. सर्वोतकृष्ट संगीत आणि उत्तम कथा असलेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खास आहे.

Tiger 3: ‘या’ अभिनेत्यांनी प्रेक्षकांना YRFच्या स्पॉयलर उघड न करण्याचे केले आवाहन

या चित्रपटात हीरची भूमिका साकारणाऱ्या नर्गिस फाखरी हिने रॉकस्टार च्या 12 वर्षाबद्दल बोलताना ती एक खास गोष्ट शेअर करते ‘रॉकस्टारचा 12 वर्षांचा प्रवास नक्कीच कमालीचा आहे.त्यावेळी हिंदी फारसे माहित नसतानाही हा चित्रपट करण हे एक आव्हान होत. हीर ची भूमिका साकारण्याचा अनुभव अगदीच सुंदर होता. सखोल अनुभव आणि सोबतीने एक आव्हान असलेला चित्रपट रॉकस्टार होता. मला अशी खास व्यक्तिरेखा मिळाल्या बद्दल मी इम्तियाज अलीचे खूप आभारी आहे.’

दरम्यान आता नर्गिस फाखरीकडे अनेक उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्स आहेत. तर चाहते तिच्या आगामी वेब सीरिज “ततलुबाज” ची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे आता ही सिरीज कधी रिलीज होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube