Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात ते त्यांच्या विद्यार्थ्याला चपलेने मारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टेबलवर ठेवलेली बॉटल कुठे गेली? असेही त्याला विचारत आहेत. या व्हिडिओमुळे राहत फतेह अली खान यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
Horoscope Today: आज ‘या’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी राहत फतेह अली खान यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये ते या मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यासोबत उभे आहेत. यामध्ये सुरुवातीला ते त्या विद्यार्थ्याची माफी मागतात. नंतर सांगतात की, हा जो मारहाणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, “तो एक उस्ताद आणि त्याच्या शिष्यामधील संवाद होता. हा माझ्यासोबत उभा असलेला माझा शिष्य आहे, तसेच गुरु-शिष्यामधील नातं असंच असतं की, शिष्याने चांगलं काम केलं त्याचं कौतुक केलं जातं. तर चुकीचे काम केलेस त्याला रागावलं जातं.”
Update : Rahat Fateh Ali Khan ( @RFAKWorld )issued a clarification regarding his viral video, There was holy water in the bottle pic.twitter.com/oIStHwWXFp
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
मात्र व्हायरल व्हिडिओवरून गायक राहत फतेह अली खान यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. तसेच या व्हिडीओबद्दल संबंधित विद्यार्थ्याने देखील प्रतिक्रिया दिली. त्याने देखील राहत फतेह अली खान यांची बाजू घेतली आहे. तो म्हणाला की, व्हिडिओमध्ये ज्या बॉटलचा उल्लेख मी केला. ती बॉटल एका शुद्ध पाण्याची बॉटल आहे. ती बॉटल मी कुठे ठेवली? हे मी विसरलो होतो. राहत फतेह अली खान हे माझे गुरु आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात. मात्र ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये लोकांनी पाहिले की ते मला मारहाण करत आहेत, मात्र तसं काहीही नाही. हे सर्व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेले कित्येक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे.