स्फोटक मृतदेहांचा वर्षाव अन् धावणारा ऑस्टिन अब्राम्स; थरारक‘रेसिडेंट ईव्हिल’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Resident Evil हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Resident Evil

Resident Evil

Rain of exploding bodies and sprinting Austin Abrams thrilling Resident Evil is set to premiere : दिग्दर्शक झॅक क्रेगर यांचा बहुप्रतीक्षित Resident Evil हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोनीच्या सप्टेंबरमधील State of Play कार्यक्रमात झॅक क्रेगर यांनी आगामी लाइव्ह-अॅक्शन Resident Evil चित्रपटाची एक थरारक झलक चाहत्यांसाठी सादर केली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता ऑस्टिन अब्राम्स याचे पात्र ब्रायन रॅकून सिटीच्या ओसाड आणि भयावह रस्त्यांवरून जीव वाचवत धावताना दिसत आहे.

‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’चा भन्नाट स्वॅग; ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

व्हिडिओ गेममधील मूळ थरार कायम ठेवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. झलकमध्ये ब्रायन हातात एक मेडिकल किट घेऊन एका रहस्यमय आणि शांत रस्त्यावरून मार्ग काढताना दिसतो. मात्र, पुढे जात असताना त्याला शहरातील संक्रमित लोक छतांवर दिसतात आणि ते त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. यानंतर परिस्थिती अधिकच भयावह बनते. स्फोट होत असलेल्या मृतदेहांच्या वर्षावातून ब्रायन जीवाच्या आकांताने धावताना दिसतो. हा प्रसंग प्रेक्षकांना अक्षरशः सीटच्या टोकावर बसवणारा असल्याचे चित्रपटाच्या झलकवरून दिसून येते.

पॅरिसमधील LVMH PRIZE मध्ये प्रियांकाचा जल्वा; कार्ल लगरफेल्ड प्राईज करणार प्रदान!

Barbarian आणि Weapons सारख्या हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक झॅक क्रेगर यांनी यावेळी survival horror अनुभवावर विशेष भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पहिले 30 मिनिटे निवडक प्रेक्षकांना दाखवण्यात आले होते. हा भाग पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचा अनुभव एखादा सर्व्हायव्हल हॉरर व्हिडिओ गेम खेळत असल्यासारखा वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. Columbia Pictures आणि Constantin Film निर्मित, तसेच TriStar Picturesच्या सहकार्याने तयार झालेला Resident Evil भारतात 18 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. Sony Pictures Entertainment India हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये केवळ चित्रपटगृहांत घेऊन येणार आहे.

Exit mobile version