Download App

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेंचे प्रश्न राज ठाकरेंना खुपणार का?

  • Written By: Last Updated:

Khupte Tithe Gupte Promo Out : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता.

या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सीझनमध्ये कोणकोणते प्रमुख पाहुणे या कार्यक्रमामध्ये पहायला मिळणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. या अगोदर जेव्हा हा कार्यक्रम झाला होता तेव्हा अनेक सेलिब्रिटी कलाकारांसह अनेक राजकीय मंडळी देखील या कार्यक्रमात आले होते.


आता या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये कोण हजेरी लावणार हे समोर आले आहे. अवधुत गुप्ते यांच्या या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे हे हजेरी लावणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण झाले. यावेळी झी मराठी वाहिनीने त्याचा प्रोमो शेअर केला आहे. पायात लेदरची मोजडी, अंगावर निळ्या रंगाचा कुर्ता आणि वागण्यात रुबाब असा काहीसा लूक असलेला एक नेता दिसत आहे. या प्रश्नोत्तरांच्या खुर्चीत बसणारे पहिले वहिले व्यक्तिमत्व कोण असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे.

मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल


यानंतर राज ठाकरेंनी लोकमत फिल्मिशी बातचित केली आहे. या कार्यक्रमाचे आधीचे एपिसोड पाहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलाखत देताना हा कार्यक्रम आपण एन्जॉय केल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. हा एक वेगळा अनुभव होता. याआधी मी अशा प्रकारची मुलाखत दिली नसल्याचे ते म्हणाले आहेत. 4 जून रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.

 

Tags

follow us