मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल

मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल

CBI Raids on Sameer Wankhede’s House : सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर (Sameer Wankhede) वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली होती. या कारवाईनंतर वानखेडे हे देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर आज त्याच वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तपास यंत्रणा त्यांच्या घरी छापे टाकत आहेत. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या या कारवाईची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

समीर वानखेडेंच्या परिसरांवर आर्यन खान क्रूज प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने आज छापेमारी केली. सीबीआयने सांगितले, की दिल्ली, मुंबई आणि रांचीसह जवळपास 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ही छापेमारी अजूनही सुरुच असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube