Download App

Jailer: थलायवाच्या ‘जेलर’मधील ‘तो’ सीन हटवण्याचा न्यायालयाकडून आदेश

Jailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतचा  (Rajinikanth) जेलर बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३१८ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, हा सिनेमा आता चांगलच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या एका दृश्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये (High Court) पोहोचले.


आता यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाने सिनेमाच्या निर्मात्यांना १ सप्टेंबरपर्यंत त्या सीनमधून जर्सी काढून ताजन्यचे आदेश देण्यात आले आहे. सुनावणीच्या दरम्यान, न्यायालयाला सांगण्यात आले की, रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या दाव्यामध्ये, पहिल्या सुनावणीनंतर, सिनेमातील आरसीबी जर्सीच्या दृश्यावर कोर्ट काय आता नेमके निर्णय देणार आहे, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता तो सीन बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिनेमाचे निर्माते यासाठी तयार आहेत अन् लवकरच हा सीन काढण्यात येणार आहे. ही गोष्ट नुकतीच रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ध्यानात आली आहे की, जेलर सिनेमात एक सीन आहे, यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलर ‘आरसीबी’ची जर्सी घालून एका महिलेविषयी अपमानजकारक भाष्य करत असल्याचे बघायला मिळाले आहे. यानंतर त्यावर आक्षेप घेत त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली होती. या सीनमुळे ब्रँडचं नाव खराब होत असल्याचे प्रायोजकांनी नाराज होण्याची शक्यता आहे.

Box Office Collection: १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी; बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ची हवा!

यामुळेच आता १ सप्टेंबरपासून सिनेमातील हा सीन हटवण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’मध्ये रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. सिनेमात थलायवा यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांची मुख्य भूमिका साकारली आहे.

Tags

follow us