Download App

Jailer: रजनीकांतचा ‘हा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला? काय आहे नेमकं कारण?

Jailer Title controversy: मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आगामी सिनेमा ‘जेलर’ (Jailer) आता चांगलच वादाच्या भवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाचे शीर्षक वादाचे कारण ठरले आहे. एका मल्याळम सिनेमा (Malayalam cinema) निर्मात्याने या सिनेमाचे नाव बदलले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नेल्सन दिलीपकुमार (Nelson Dilip Kumar) यांच्या सिनेमाचे नाव इतर राज्यात नाही तर, किमान केरळमध्ये तरी बदलले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.


इतकेच नाही तर, हे आपल्या सिनेमाचे शीर्षक असून ते ‘जेलर’च्या निर्मात्यांनी चोरले असल्याचा आरोप देखील यावेळी लावण्यात आला आहे. मल्याळम निर्मात्याच्या दाव्यानुसार, त्याने या सिनेमाच्या नावाची नोंद अगोदरच केल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. तसेच केरळमध्ये या सिनेमाचे नाव बदलण्यात यावे यासाठी तो कोर्टात जाणार आहे. रजनीकांत त्यांच्या या आगामी ‘जेलर’ सिनेमात जेलरची भूमिका साकारत असताना दिसून येणार आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी चाहते खूप मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

आतापर्यंत या सिनेमाच्या कथेशी संबंधित सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. तर, ‘जेलर’मधील रजनीकांतच्या व्यक्तिरेखेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. ‘जेलर’ या सिनेमाचे नाव बदलण्यावरून केरळमध्ये आता चांगलाच वाद पेटत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे रजनीकांत यांचा ‘जेलर’ प्रदर्शित होत असतानाच, दुसरीकडे त्याच नावाचा आणखी एक मल्याळम सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. ‘जेलर’ नावाच्या मल्याळम सिनेमात अभिनेता ध्यान श्रीनिवासन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचा हा सिनेमा एक पीरियड थ्रिलरवर ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

साकीर मदाथिल आणि एनके मोहम्मद या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. दोन्ही सिनेमाच्या कथा सारख्या नसल्या तरी, ‘जेलर’ या नावामुळे चाहत्यांना मोठा त्रास होणार आहे, आणि याचा सिनेमाला मोठा फटका बसणार आहे, असे त्यांचे आरोप आहेत. या प्रकरणी मल्याळम सिनेमाचे निर्माते साकीर मदाथिल यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी रजनीकांत यांच्या सिनेमाची निर्मिती करणारी कंपनी सन पिक्चर्सशी संपर्क साधल्याचे देखील उघड केले आहे. परंतु रजनीकांत यांच्या सिनेमाच्या शीर्षकात काही देखील बदल होणार नाही, असे मेकर्सनी यावेळी ठणकावले आहे. केरळच नव्हे तर, देशाच्या कोणत्याही राज्यात या सिनेमाचे शीर्षक बदलणार नसल्याचे, सन पिक्चर्सनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us