Download App

रजनीकांतचा मोठा धमाका! बहुप्रतिक्षित लाल सलामचा टीझर रिलीज, अॅक्शन अवताराने वेधलं चाहत्यांचं लक्ष

  • Written By: Last Updated:

Lal Salaam Teaser: अभिनेते रजनीकांतचा (Rajinikanth) चित्रपट जेलर 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. जेलरची क्रेझ कमी होत नाही तोच आता रजनीकांतचा यांचा नवा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रजनीकां यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात. त्यांचे चाहते त्यांच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. रजनीकांत यांच्या लाल सलाम (Lal Salaam) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

PM Modi Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी 

रजनीकांत यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. रजनीकांत आपल्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. नुकताच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या मोस्ट अवेटेड लाल सलाम या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात चाहत्यांना स्पोर्ट्स ड्रामा पाहायला मिळणार असून टीझरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील काही दृश्ये दिसत आहेत. त्या सामन्यादरम्यान उसळलेली दंगल आणि रजनीकांत यांच्या अफलालून अॅक्शन सीन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या कॅमिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या काही सेकंदांच्या रजनीकांतच्या एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात रजनीकांत छोट्या भूमिकेत आहे. रजनीकांत जरी या चित्रपटात खुप कमी वेळासाठी असले तरी त्यांची छोटी भूमिका खूपच स्फोटक आहे. यात रजनीकांत भरूपर अॅक्शन करतांना दिसत आहेत.

CM शिंदेंचा साधेपणा! मिसळीचा घेतला सहकाऱ्यांसोबत आस्वाद; स्वत: भरलं बिल, कामगारांना दिलं दिवाळी गिफ्ट 

या चित्रपटातील गाणी ए आर रहमानने संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांनी ‘मोईदीन भाई’ची भूमिका साकारली होती. लाल सलाम या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले आहे. हा तिचा तिसरा चित्रपट आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाची स्पर्धा धनुषच्या कॅप्टन मिलय या चित्रपटाशी आहे.

हा चित्रपट 2024 मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दिग्गज क्रिकेटर कपिल देव देखील अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

Tags

follow us