PM Modi Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली.यावेळी त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांना संबोधित करताना त्यांच्या शौर्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले. लष्करात महिलांच्या वाढत्या सहभागाचेही त्यांनी कौतुक केले.

2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त सियाचीनमध्ये तैनात जवानांसोबत आनंद शेअर केला होता. हे जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे आणि तेथील परिस्थिती अत्यंत कठीण आहे.

2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी कारगिलमध्ये तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. कारगिल युद्धात भारताच्या विजयासाठी हे ऐतिहासिक ठिकाण आहे.

2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.पंतप्रधान मोदींचे हे पाऊल सैनिकांचे मनोबल वाढवणारे होते.

140 कोटी लोकांचा हा मोठा परिवार तुमचा आहे असे तुम्ही मानता. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या काळात तुमच्या कल्याणासाठी दिवाही लावला जातो. माझ्यासाठी आमचे सैन्य ज्या ठिकाणी तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही. तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी माझा सण, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
