Raj Kumar Hirani : ‘डंकी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Raj Kumar Hirani) यांनी या चित्रपटाच्या यशानंतर मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टबद्दल मोठा खुलासा केला आहे. हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले अलीकडील चित्रपटही चांगली कमाई करत आहेत. शाहरुख खान अभिनित डंकी चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रेक्षकांना चित्रपटाची कथा पसंत पडल्याचे दिसत आहे. डंकीच्या यशाननंतर पुढं काय करणार याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी दिली आहे.
हिरानी यांनी 20 वर्षांपूर्वी मुन्नाभाई हा चित्रपट दिग्दर्शित करून एक वेगळीच कथा दिली होती. या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पुढील तीन वर्षात त्यांनी लगे रहो मुन्नाभाई हा आणखी एक चित्रपट आणला. या चित्रपटालाही चांगलं यश मिळालं. त्यामुळे आता याचा पुढचा भाग (Munnabhai 3 ) कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच हिरानी यांनी मोठा खुलासा केला आहे.
चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किट या व्यक्तिरेखा इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की लोकांच्या बोलाचालीतीह हे शब्द वारंवार येताना दिसतात. त्यामुळेच चित्रपटात ते पुन्हा केव्हा पहायला मिळणार याची वाट लोक पाहत आहेत. आता हिरानी यांनी याबाबत एक हिंट दिली आहे. ज्यामुळे चाहते नक्कीच खुश होतील.
डंकी चित्रपटाच्या यशानंतर दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई 3 चित्रपटाच्याबाबतीत माहिती दिली. मागील दोन चित्रपटांनी इतकं मोठं यश मिळवलं आहे की आता त्यांची बरोबरी गाठणं कठीण झालं आहे. दोन्ही चित्रपट इतके चांगले तयार झाले होते की त्यानंतर माझ्याकडील पाच चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स अर्धवटच राहिल्या. मुन्नाभाई 3 साठी संजय दत्तबरोबर चर्चा होत असते. त्यावेळी तो म्हणतो की चित्रपटाचा पुढील भाग बनवला पाहिजे. आता तर डंकी संपला आहे आता मी जुन्या कहाण्यांचं गाठोडं नक्कीच उघडणार आहे. मला तर वाटतं की आणखी एक मुन्नाभाई नक्कीच तयार केला पाहिजे पण कधी याचं उत्तर आज तरी माझ्याकडं नाही.
Box Office: ‘डंकी’ने जगभरात पार केला 150 कोटींचा आकडा; भारतात कमावले ‘एवढे’ कोटी
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकतचं रिलीज झालेला चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) आणि सालार हे सिनेमे भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office ) आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. शाहरुख खानच्या या वर्षातील दोन सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या तुलनेत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कामगिरी करत आहे. ‘डंकी’ने आतापर्यंत 167 कोटी रुपयांची कमाई केली आहे.