Download App

Rajkumar Rao: राजकुमार रावचा पान टिपू येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Rajkumar Rao Guns Gulaabs Second season:  नेटफ्लिक्स इंडिया सोबत चित्रपट निर्माते जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गन्स अँड गुलाब्स’ (Guns Gulaabs series) या त्यांच्या प्रचंड यशस्वी गुन्हेगारी वेब सीरिजचा (Web series) दुसरा सीझनची (Second season) घोषणा करण्यात आली आहे.


राजकुमार साठी यंदाच वर्ष सिनेमॅटिक मय झालं आणि या वर्षात त्याने आपल्या अभिनया साठी अनेक पुरस्कार देखील पटकावले. या वर्षी त्याची एक भूमिका गाजली आणि ती म्हणजे “पान टिपूची ” तो पुन्हा एकदा ही भूमिका पुन्हा साकारणार असल्याचं कळतंय. गन्स अँड गुलाब्स चा दुसरा सीझन कधी रिलीज होईल हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी 2024 च्या सुरुवातीला याचा दुसरा भाग येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राजकुमार येणाऱ्या वर्षात याच शूट सुरू करणार असल्याचं कळतंय. गन्स अँड गुलाब्स च्या दुसरा सीझन मध्ये राजकुमार राव आणि राज आणि डीके ही ड्रीम टीम टीम तिसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे. राजकुमार राव यांनी पूर्वी सांगितले होते की या चित्रपट निर्मात्या जोडीसोबत त्याला काम करताना आनंद होतो.

भाईजानचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा टप्पा; आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी

कायम कारण ते नेहमीच आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी हटके करतात आणि त्यांच्या सोबतीने काम करण्याची मज्जा वेगळी असते. पान टिपूच्या भूमिकेसाठी त्याने 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार जिंकला आता प्रेक्षकांना नव्या सीजन ची उत्सुकता लागून राहिली आहे.

follow us

वेब स्टोरीज