Box Office: राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची विकेंडला जोरदार कमाई, आतापर्यंत कितीचा गल्ला जमवला?

Srikanth Box Office Collection: तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'श्रीकांत' मधील राजकुमार रावच्या शानदार अभिनयाची खूप तोंडभरून कौतुक केलं जात आहे.

Box Office: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची विकेंडला जोरदार कमाई, आतापर्यंत कितीचा गल्ला जमवला?

Box Office: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची विकेंडला जोरदार कमाई, आतापर्यंत कितीचा गल्ला जमवला?

Srikanth Box Office Collection Day 4: तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ मधील (Srikanth Movie) राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) शानदार अभिनयाची खूप तोंडभरून कौतुक केलं जात आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुरू झाली असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात संथ झाली असली तरी वीकेंडला ‘श्रीकांत’ने प्रचंड नफा कमावला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?

‘श्रीकांत’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली?

राजकुमार रावचा वर्षातील पहिला रिलीज झालेला ‘श्रीकांत’ त्याच्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी होत आहे. राजकुमार रावचा जबरदस्त अभिनय पाहून चाहते त्याच्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची मागणी करत आहेत. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसवरची निराशा दूर करेल असे वाटते.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाच्या कमाईत 86.67 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आणि त्याने 4.2 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ‘श्रीकांत’च्या कमाईत 25 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने 5.25 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सोमवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी 1.75 कोटी रुपये कमवले आहेत. यासह ‘श्रीकांत’ची चार दिवसांची एकूण कमाई 13.64 कोटींचा गल्ला कमावला आहे.


श्रीकांतने मोडला ‘मैदान’चा विक्रम

‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासोबत या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘मैदान’चा पहिल्या सोमवारचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘मैदान’ने पहिल्या सोमवारी 1.5 कोटी रुपये कमावले होते. पहिल्या सोमवारी ‘श्रीकांत’ची कमाई 1.75 कोटी रुपये होती. ‘श्रीकांत’च्या कमाईचा वेग पाहता 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लवकरच निम्मा खर्च वसूल करेल असे दिसते.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एका आरोपीला हरियाणातून अटक

काय आहे ‘श्रीकांत’ची कथा?

‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. राजकुमार रावने या चित्रपटात श्रीकांत बोल्लाची भूमिका साकारली आहे. शैतान अभिनेत्री ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Exit mobile version