Download App

Rajkumar Rao च्या घरी झालं पर्यावरण पूरक बाप्पांचं आगमन!

  • Written By: Last Updated:

Rajkumar Rao : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. त्यात गणपती बाप्पा आणि राजकुमार राव हे कनेक्शन देखील दरवर्षी पाहायला मिळतं. त्यातही तो पर्यावरण पूरक बाप्पांची स्थापना करून एक बेंच मार्क सेट करत असतो.

शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप

यावर्षी देखील राजकुमारने (Rajkumar Rao) पर्यावरण पूरक बाप्पांची स्थापना तर केलीच पण तो दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती बनवतो. याही वर्षी त्याने पर्यावरण पूरक आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या बाप्पांची स्थापना केली आहे. त्याच बरोबर राजकुमारच्या गणपतीची आणखी एक खासियत म्हणजे तो गव्हाच्या पीठापासून गणपतीची मूर्ती साकारतो. तसेच तो बाप्पांचे डोळे तसेच सजवण्यासाठी डाळींचा वापर करतो.

Abdul Sattar : तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे? अब्दुल सत्तारांनी उत्तर देताच हशा पिकला

दरम्यान आज राज्यासह देशात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यात राजकुमार राव (Rajkumar Rao) मागे कसा राहिल. तसेच त्याने आपल्या या गणेशोत्सवावर काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याचीम प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे.’

अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा अनोखी असते. आता लवकरच तो नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे आणि तेही वेब सिरीजमधून. ‘गन्स अँड गुलाब’ (Guns and Gulaabs) असे या वेब सिरीजचे नाव आहे. नुकताच या सिरीजमधील त्याच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. हा लुक सध्या सोशल मिडीयावर (Social media) भरपूर व्हायरल होत आहे.

Tags

follow us