Abdul Sattar : तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे? अब्दुल सत्तारांनी उत्तर देताच हशा पिकला
Abdul Sattar : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत अनेकदा चर्चेत असलेले अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Satta) हे कायमच सत्तेत राहिले आहेत, राज्यात सत्ता कोणाचीही असो पण अब्दुल सत्तार राज्याच्या मंत्रिमंडळात असणार असं कायमच दिसून आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना प्रत्येक मंत्रिमंडळात तुम्ही कसे? असा सवाल विचारताच माझ्या नावात सत्ता असल्याने मी सत्तेत असतो, माझा कुणाशीही पर्मनंट करार नसतो, असं सत्तारांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी सत्तार यांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
अजितदादांना फडणवीसांचा सपोर्ट; ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांना फटकारलं
पुढे बोलताना सत्तार म्हणाले, आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरं इंजिन जोडलं. मी सगळीकडे असतो कारण माझा कुणाशाही पर्मनंट करार नसतो. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असंही अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप-अजितदादा गटात ठिणगी! पडळकरांवर कारवाईसाठी सुनिल तटकरे फडणवीसांनी भेटणार
यावेळी बोलताना सत्तारांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावरही टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले, आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी दानवेंसारखे अनेकजण मागे लागले आहेत, एखाद्याने जरी गुन्हा केला असेल तरीही त्याला आपल्या भावना मांडण्याची परवानगी असतेच, म्हणूनच देश लोकशाही असल्याचंही ते म्हणाले आहेत.
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंवर मध्यरात्री हल्ला, एकटं गाठून गाडी अडवली अन्…
अंबादास दानवेंची(Ambadas Danve) टोलेबाजी :
नूकतीच जिल्हा बॅंकेची बैठक पार पडली. या बैठकीत अंबादास दानवे म्हणाले, अर्जून गाढे तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाही तर सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका, पुढे काही झाले तर मैं ने तो कुछ नही किया, वो तो अर्जुनने किया असे म्हणायला देखील सत्तार मागेपुढे पाहणार नसल्याचं दानवे म्हणाले आहेत.
जिल्हा बॅंकेच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या सभेत अनेक नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत एकेमकांना खोचक टोले देखील लगावले आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या कोण कुठल्या पक्षात आहे ते कळतच नाही. जे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात कामे सुरू आहेत,’ असा दावाही सत्तार यांनी केला आहे.