Download App

Mr and Mrs Mahi: राजकुमार-जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली

Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.

Mr and Mrs Mahi OTT Release Date: ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi) हा रोमँटिक चित्रपट 31 मे रोजी रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सरासरी ठरला पण आता ओटीटीवर (OTT ) रिलीजसाठी सज्ज आहे. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अभिनीत या चित्रपटाची कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या कुटुंबासह ते पाहू शकणार आहात.


‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi ) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सला विकले आहेत, पण हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हा प्रश्न आहे.

‘मिस्टर अँड मिसेस माही’चे ओटीटी रिलीज

नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘त्यांची कहाणी एक अंतिम सामना आहे. मिस्टर अँड मिसेस माही आता तुमच्या स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे, मिडनाईट नेटफ्लिक्सवर येत आहे.

Mr And Mrs Mahi: जान्हवी अन् राजकुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ची रिलीज डेट ढकलली पुढे

या पोस्टनुसार, 26 जुलैची तारीख 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पडताच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग सुरू होईल. चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पती-पत्नी बनले असून त्यांची अनोखी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. याशिवाय झरीना वहाब, हिमांशू जयकर, राजेश शर्मा आणि कुमुद मिश्रा यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले होते.

शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली होती. मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचे बजेट सुमारे 40 कोटी रुपये होते आणि चित्रपटाने सुमारे 50 कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरी ठरला.

follow us