Mr and Mrs Mahi: ‘असा चित्रपट पहायलाच हवा’; राजकुमारच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’चं तोंडभरून कौतुक

Mr and Mrs Mahi: ‘असा चित्रपट पहायलाच हवा’; राजकुमारच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’चं तोंडभरून कौतुक

Mr and Mrs Mahi Released: राजकुमार रावसाठी (Rajkummar Rao) मे महिना नक्कीच खास ठरला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचे बॅक टू बॅक त्याचे चित्रपट येत आहे आणि प्रेक्षकांचं मन जिंकून घेतोय यात शंका नाही. ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) सोबत प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर राजकुमार राव पुन्हा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi Movie) मधून रुपेरी पडद्यावर परतला आहे.

अभिनेत्याने ‘श्रीकांत’ मध्ये दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका साकारली असताना, त्याने ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सोबत हलक्याफुलक्या भूमिकेत आता दिसणार आहे. त्याने ‘श्रीकांत’ मधून आधीच मन जिंकले असताना सर्वात पॉवरपॅक परफॉर्मरने ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवन्यासाठी सज्ज आहे.

‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये राजकुमार रावने महेंद्र ‘माही’ ची भूमिका साकारली आहे. हे ज्या पात्र रोमान्स आणि तितकच खास आहे. विविध आव्हानात्मक भूमिकांमधून राजकुमार राव चा प्रवास आज पर्यंत खास राहिला आहे. प्रत्येक चित्रपटासह तो एक नवीन दृष्टीकोन देखील देऊन जातो आणि प्रेक्षकांच्या मनात राहतो.

आता तो त्याचा आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये तो प्रथमच तृप्ती दिमरीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. याशिवाय, तो हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मध्ये ‘विकी’ ची भूमिका पुन्हा साकारणार आहे.

Mr And Mrs Mahi ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या…

ओटीटीवर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?

‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाची धमाल पाहता पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरशी संबंधित तपशील देखील आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मिस्टर अँड मिसेस माही’चे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सने स्ट्रिम केले आहेत. चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला, थिएटर रन संपल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube