Download App

Stree 2: राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’चे नवीन पोस्टर आऊट, ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Stree 2 Poster Release Out: राजकुमार रावचा वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री 2' च्या (Stree 2 Movie) रिलीजसाठी तयारी करत आहे.

  • Written By: Last Updated:

Stree 2 Poster Release Out: राजकुमार रावचा (Rajkummar Rao) वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट ‘स्त्री 2’ च्या (Stree 2 Movie) रिलीजसाठी तयारी करत आहे. आणि चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या दोन दिवसांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. अभिनेत्याने चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे (Stree 2 Poster ) अनावरण करून ही खास माहिती प्रेक्षकांना दिली. चित्रपटाच्या टीझरला प्रचंड प्रेम मिळत असताना 18 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि त्यात राजकुमार रावच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला राजकुमार रावने बॉक्स ऑफिसवर ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या दोन रिलीझसह वर्चस्व गाजवले आणि ‘स्त्री 2’ टीझरला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघून आता सगळेच ट्रेलर ची वाट बघत आहेत. सर्वात अष्टपैलू कलाकार हिट्सची हॅट्रिक करण्यासाठी तो सज्ज आहे. 2024 हे त्याचे वर्ष आहे यात शंका नाही. ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यांनी चांगली कामगिरी केल्या नंतर ‘स्त्री 2’ ची सगळ्यांना उत्सुकता आहे.

25 जून रोजी टीझर रिलीज

25 जून रोजी ‘स्त्री 2’ चा टीझर रिलीज झाला होता. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर टीझर पोस्ट करताना राजकुमार राव यांनी लिहिले होते, यावेळी स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये दहशत असेल. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी दंतकथा परत येत आहे. ‘स्त्री 2’ ती परत आली आहे. व्हिडिओची सुरुवात राजकुमार राव आणि इतरांनी एका महिलेच्या पुतळ्यावर दूध अर्पण केल्यापासून होते. यानंतर गावात गोंधळाचे वातावरण असून, ‘बाई परत आल्या’ असे सर्वजण वारंवार सांगतात. स्त्री भूमिकेत श्रद्धा कपूरची झलकही पाहायला मिळणार आहे. तमन्ना भाटिया देखील टीझरमध्ये दिसली होती.

Stree 2 Release Date: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार श्रद्धाचा ‘स्त्री

‘स्त्री 2’ची स्टार कास्ट

पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘स्त्री 2’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us