Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) हा त्याच्या विनोदी भूमिकांनी चाहत्यांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये राजपालने अनेक मजेशीर भूमिका साकारले आहे. लहान पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावरच्या या प्रवासात तो नेहमीच कॉमेडी भूमिका साकारत असला तरी खासगी आयुष्यामध्ये त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या पहिल्या बायकोबद्दल एक भयानक आठवण सांगोतले आहे. अवघ्या २० व्या वर्षीच राजपालने त्याच्या पहिल्या बायकोला गमावलं होतं.
दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजपालने सांगितले आहे की, लहान वयातमध्ये माझं लग्न झालं होतं. “त्याकाळी जर तुम्ही २० वर्षांचे असाल आणि तुमच्याकडे चांगली नोकरी असेल तर लग्नासाठी लगेच स्थळं येत असतं. यामुळे वयाच्या २० व्या वर्षी वडिलांनी माझं लग्न लावून दिले आहे. माझ्या पहिल्या बायकोने मुलीला जन्म दिला आणि डिलिव्हरीनंतर तिचं निधन झालं. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी तिला रुग्णालयात भेटायला जाणार होतो पण त्याऐवजी मी तिचं पार्थिव माझ्या खांद्यावर उचललं होतं.
सुदैवाने माझ्या कुटुंबीयांनी, आईने आणि वहिनींनी माझ्या मुलीची खूप उत्तमप्रकारे काळजी घेतली आहे. तिला आईची कमतरता त्यांनी कधीही भासू दिली नाही”, असं राजपालने यावेळी सांगितलं आहे. १९९१ मध्ये पहिल्या बायकोच्या निधनानंतर राजपालने अभिनय क्षेत्रात आपला चांगलंच नाव कमावला. १३ वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने इंडस्ट्रीत खूपच खतरनाक मेहनत केली. यावेळी त्याने एनएसडीमध्ये शिक्षण आणि त्याचबरोबर सिनेमामध्ये काम केलं. मी ३१ वर्षांचा असताना माझी भेट राधाशी झाली. २००१ मध्ये मी ‘द हिरो’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलो होतो, तिथेच माझी आणि तिची भेट झाली. आम्हा दोघांच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर अखेर २००३ मध्ये आम्ही लग्न केलं”, असं यावेळी सांगितलं.
Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन
दुसऱ्या बायकोबद्दल बोलत असताना राजपाल पुढे म्हणाला की, मी माझ्या बायकोला कधीच साडी नेसण्याची सक्ती केली नाही. मी माझ्या आईशी ज्याप्रकारे बोलत असत, तीसुद्धा त्यांच्याशी तशीच बोलते. तिने आमची भाषा शिकून घेतली. एकेदिवशी जेव्हा मी गावी गेलो, त्यावेळेस मला ती पदराने चेहरा झाकलेली दिसली. कारण गावी महिला तशाप्रकारे राहत असतात. होळी आणि दिवाळीनिमित्त ती गावी आवर्जून जात असतो, आणि तिला ५ भाषा बोलता येतात याचा अंदाजही कोणी लावलेला नव्हता. माझे गुरू आणि आईवडिलांनंतर तिनेच माझी खूप उत्तम साथ दिली आहे. माझ्या मुलीवर तिने सख्ख्या आईसारखं प्रेम करत आहे. तिला कधीही आई कमतरता भासू दिली नाही.