Download App

Rakesh Roshanची फसवणूक करणाऱ्या ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस; प्रकरण नक्की काय?

Fraud with Rakesh Roshan: प्रख्यात बॉलिवूड (Bollywood) सिनेमा निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयात (Bombay High Court) धाव घेतली होती. ५० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात ३० लाख कोर्टाच्या आदेशानंतर परत करण्यात आलुयाची माहिती समोर आली आहे. परंतु उर्वरित २० लाख रुपये अजून देखील परत मिळाले नाहीत.

या प्रकरणी आता सोमवारी उच्च न्यायालयाने ठगांना नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. सीबीआय (CBI) अधिकारी अशी स्वतःची ओळख सांगून बॉलिवूड सिनेमा निर्माता राकेश रोशन यांची फसवणूक करणाऱ्या दोन लोकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राकेश रोशनने दोघांना दिलेल्या एकूण ५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये परत करण्याची मागणी करण्यात आली होती.

अश्विनी कुमार शर्मा आणि राजेश रंजन या दोन्ही ठगांना २०११मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने सिनेमा क्षेत्रातील व्यक्ती आणि व्यावसायिकांसह २००पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्या या याचिकेमध्ये ट्रायल कोर्टाने सांगितलेल्या २०१२च्या आदेशानुसार राकेश रोशन यांना ३० लाख रुपये मिळाले होते. परंतु त्यांना अजून देखील २० लाख रुपये परत मिळाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दोन्ही आरोपींविरुद्धचा खटला प्रलंबित होईपर्यंत ट्रायल कोर्टाने राकेशला ३० लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

Goregaon Film Cityमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहून मनसेने काढले वाभाडे, म्हणाले…

ऑगस्ट २०२०मध्ये राकेश रोशन यांनी या प्रकरणाची सुनावणी अद्याप पूर्ण न झाल्याचे उर्वरित २० लाख रुपयांसाठी ट्रायल कोर्टात अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु आता कोर्टाने डिसेंबर २०२१मध्ये राकेश रोशन यांचा अर्ज फेटाळला असल्याचे समोर आहे. यामध्ये २०१२च्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु आता यावर सत्र न्यायालयाने सांगितले होते की, राकेश यांचा अर्ज राखता येणार नाही, कारण सिनेमा निर्मात्याने २०१२च्या आदेशाला तेव्हा आव्हान दिले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर राकेशने २०१२ आणि २०२१मध्ये सत्र न्यायालयाने दिलेले आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे दिसून आले होते.

Tags

follow us