Salman Khan: भाईजानच्या लग्नासाठी राखी सावंतचा खास नवस; म्हणाली, “देशाला तुझ्या मुलांची…”

Rakhi Sawant Mannat: ड्रामा क्वीन राखी सावंतचा सध्या एक व्हिडीओ जोडणे व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओत राखी ही अनवाणी पायांनी चालत असल्याचे दिसून येत आहे. तिला अनवाणी पायाने चालण्या पाठीमागचे कारण विचारले असता तिने चाहत्यांना भन्नाटच उत्तर दिले आहे. (Salman Khan)  म्हणाली आपला नवस असून तो नवस पूर्ण होत नाही, तोपर्यंत अनवाणी पायाने […]

Rakhi Sawant Mannat

Rakhi Sawant Mannat

Rakhi Sawant Mannat: ड्रामा क्वीन राखी सावंतचा सध्या एक व्हिडीओ जोडणे व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओत राखी ही अनवाणी पायांनी चालत असल्याचे दिसून येत आहे. तिला अनवाणी पायाने चालण्या पाठीमागचे कारण विचारले असता तिने चाहत्यांना भन्नाटच उत्तर दिले आहे. (Salman Khan)  म्हणाली आपला नवस असून तो नवस पूर्ण होत नाही, तोपर्यंत अनवाणी पायाने फिरणार असल्याचे सांगितले आहे.

 

मी भाईजानसाठी (Bhaijaan) नवस केला आहे. मी श्रीलंका आणि दुबईहून चप्पल न घालता आले आहे. जोपर्यंत भाईजानच लग्न होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नसल्याचे यावेळी तिने सांगितले आहे, भाईजान हा माझा भाऊ आहे.भाईजान लग्न कर, माझ्या पायाची सालटं निघून जात आहेत. भाईजान लग्न करा आणि मुलं होऊ द्या. या देशाला तुझी मुलं हवी आहेत,” असं राखी सावंत व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून म्हणत असल्याचे दिसून येत आहे.

 

दरम्यान राखीही गेल्या काही महिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आदिल खान दुर्रानीशी तिने लग्न केलं आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिचा घटस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने घटस्फोटाची माहिती दिली होती. अलीकडेच राखीने आदिलपासून घटस्फोट घेतला आहे, ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. तिच्या या ब्रेकअप पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असल्याचे दिसून आले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचत असलयाचे दिसून येत आहे.

 

टाइस्च ती पुढे म्हणाली होती की मी शेवटी घटस्फोट घेतल आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी असल्याचे भाष्य तिने यावेळी केले होते. लोक दु:खी आहेत पण मी खूप आनंदी आहे. राखीला प्रत्येकवेळी भाईजान हा मदत करत असतो. तिच्या आईच्या आजरापणात देखील भाईजान तिच्या मदतीला धावून आला होता. यासाठी राखीनं भाईजान आणि सोहेल खानचे मनापासून आभार देखील मानले होते. भाईजानला ती नेहमीच भाऊ मानत असते. प्रत्येकवेळी भाईजान तिच्यासाठी कायम उभा राहिलेला असतो.

Exit mobile version