मराठी चित्रपटांचा इफ्फीमध्ये डंका! भारतीय पॅनोरमा विभागासाठी 7 चित्रपटांची निवड

IFFI 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतल्या विविधतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

IFFI

Marathi cinema makes a splash at IFFI! 7 films selected for the Indian Panorama section : हिंदी चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र असलेली मुंबई ही मराठी चित्रपटसृष्टीचीही समृद्ध परंपरा जपणारी नगरी आहे. बॉलिवूडला समांतर विकसित झालेल्या मराठी चित्रपटसृष्टीने आशयघन कथन, वास्तववादी मांडणी आणि साहित्याशी असलेली घट्ट नाळ यांच्या बळावर स्वतःची वेगळी, स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या चिरंतन चित्रपटपरंपरेचा गौरव करण्यासाठी 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतल्या विविधतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. समकालीन कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांच्या निवडीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतल्या नामवंत व्यक्तिमत्त्वांना आणि चित्रपटविषयक वारशाला आदरांजली वाहण्यात येणार आहे.

IFFI 2026 मध्ये कोण मारणार बाजी? सर्वोत्कृष्ट वेब सीरिजसाठी 5 मालिकांमध्ये रंगणार लढत

यंदाच्या इफ्फीमध्ये भारतीय पॅनोरमा विभागासाठी 7 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कथापट विभागात महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ या चित्रपटाचा समावेश आहे. अभिनयक्षेत्रात यश मिळवण्याची आकांक्षा असलेला एक तरुण आणि त्याचे आजोबा यांच्यातले भावनिक नाते या चित्रपटातून उलगडण्यात आले आहे. कुटुंबातल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याची जबाबदारी, कौटुंबिक कर्तव्ये आणि यशाचा खरा अर्थ, यांसारख्या विषयांवर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटात अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले आणि योगेश शिरसाट यांच्या भूमिका आहेत.

बॉलिवूडमध्ये खळबळ! सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी

भारतीय पॅनोरमाच्या मुख्य प्रवाहातल्या चित्रपट विभागात प्रवीण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ आणि समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटांचा समावेश आहे. शेतकरी पती गमावलेल्या एका महिलेची कथा सांगणारा हा सिनेमा आहे. तर ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट शेतकऱ्याच्या समस्यांचे चित्रण करतो. ‘बाप्या’ या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्ती आपल्या मूळ गावी परतल्यानंतर घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून कुटुंब आणि लिंगभावविषयक ओळख या विषयांची गुंफण करण्यात आली आहे.

भारताला अमेरिकेतून येणार LPG ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मीडल इस्टमधील अवलंबित्व कमी होणार !

जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट आहे. इफ्फीमध्ये भारतीय कथापटांच्या विभागात सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाच्या श्रेणीसाठी निवड झालेल्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे. नातेसंबंध, त्याग आणि मनातल्या भावना व्यक्त न केल्यामुळे होणारी घुसमट यांचा वेध घेणारा हा संवेदनशील कौटुंबिक चित्रपट आहे.

आयर्न मॅननंतर आता डॉक्टर डूम! रॉबर्ट डाउनी ज्युनियरने सांगितला कमबॅकचा थरारक किस्सा

भारतीय पॅनोरमाच्या कथाबाह्य चित्रपट विभागातही तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. या तिन्ही चित्रपटांमधून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. अमित पाटकर दिग्दर्शित ‘पनिशमेंट’ अर्थात ‘शिक्षा’ या चित्रपटात परस्परांशी संबंध नसलेल्या वाटणाऱ्या चोरीच्या दोन घटनांच्या माध्यमातून अपराध-भाव आणि त्याचे परिणाम यांचा वेध घेण्यात आला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘स्काय ट्री’ अर्थात ‘आभाळवृक्ष’ या चित्रपटात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एका गावकऱ्याच्या आशा-आकांक्षांचे चित्रण आहे. तर निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘द मून’ अर्थात ‘चांदोबा’ या चित्रपटात कोड या त्वचारोगाचा सामना करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचा संघर्ष आणि या आजारामुळे त्याला समाजाकडून मिळणारी वागणूक यांचे चित्रण करण्यात आले आहे.

माझ्या काकांचा जळालेला चेहरा कधीच विसरणार नाही; पुतळे जाळणाऱ्यांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

भारतीय पॅनोरमात असलेल्या चित्रपटांव्यतिरिक्त, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक गावडे दिग्दर्शित ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे प्रदर्शन महोत्सवातल्या गाला प्रीमियर विभागात करण्यात येणार आहे. चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित ‘देवखेळ’ या वेबमालिकेची इफ्फीच्या सर्वोत्कृष्ट वेबमालिका पुरस्काराच्या श्रेणीत निवड झाली आहे. त्यामुळे मराठी कथनाला वेबमालिकांच्या माध्यमातूनही या महोत्सवात स्थान मिळाले आहे.

Imtiaz Jaleel : टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

महोत्सवाच्या शताब्दी अभिवादन विभागात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचाही गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या निमित्ताने 1965 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘साधी माणसं’ हा मराठी चित्रपट राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून पुनर्संचयित स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रभावी आणि अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनाही 57 व्या इफ्फीमध्ये विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे. महोत्सवात त्यांचा‘दीक्षा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच मिरामार बीच इथे त्यांच्या गाजलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे खुल्या मैदानात विशेष प्रदर्शन होणार आहे. या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीतल्या या दिग्गज अभिनेत्याच्या चिरंतन योगदानाचा गौरव करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

follow us