मुंबई : राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे एका इराणी महिलेने आदिल खानवर (Adil Khan) अत्याचाराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन आदिलने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हैसूरच्या व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आदिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ravikant Tupakar यांच्या आंदोलनात पत्रकारांवरही पोलिसांचा लाठीमार
तक्रारीनुसार, इराणी विद्यार्थिनीने आदिलवर म्हैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणी तरुणीने 5 महिन्यांपूर्वी आदिलकडे लग्न करण्याची मागणी केली असता, त्याने लग्नास नकार दिला आणि सांगितले की, तुझ्यासारख्या अनेक मुलींसोबत माझे संबंध आहेत.
मुलीने आदिलला आपण पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी दिली तेव्हा त्याने तिला दोन मोबाईल नंबरवरून स्नॅपचॅटवर मुलीचे काही अंतरंग फोटो पाठवले. मुलीने तक्रारीत दोन्ही फोन नंबरही नमूद केले आहेत. आदिलने मुलीला धमकी दिली की तो ती छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करेल आणि तिच्या पालकांनाही पाठवेल. तसेच तरुणीने आपल्याविरुद्ध तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
राखीने आदिलवर केले हे आरोप
राखी सावंतनेही आदिलवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. राखीचा दावा आहे की आदिल तिच्याशी वाईट वागायचा. तिला बेदम मारहाण करायचा. आदिलचे इतर अनेक मुलींसोबत अफेअर असल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता आदिलवरही अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.