Ravikant Tupakar यांच्या आंदोलनात पत्रकारांवरही पोलिसांचा लाठीमार
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी शनिवारी (दि.11) फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर देखील पोलिसांकडून लाठीमार (Lathicharged by police on journalists) करण्यात आला. यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस (City Police)ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना देखील ठाण्यात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोरच आज पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
याबद्दल अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी म्हणाले की, रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनावेळी काही जणांकडून दगडफेक झाली. त्यामुळं सौम्य बळाचा वापर करण्यात आलाय. काही स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सांगितलंय.
रविकांत तुपकर यांना पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधींना पोलीस टाण्याच्या आवारात भेटू दिलं नाही. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनाही काही काळ पोलीस ठाण्याच्या गेटवरच उभं राहावं लागलं. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज झालेल्या घटनेचा निषेध केलाय. यावेळी झालेल्या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.
Congress : ‘त्या’ घटनेवर काँग्रेस आक्रमक; थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची केली मागणी..
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं या घटनेचा निषेध म्हणून त्याचे वाशिम जिल्ह्यात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी मालेगांव येथील एसटी बसच्या काचा फोडल्या तर मानोरा येथील महावितरण कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर काही महामार्गावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं. त्यामुळं आज पुन्हा आंदोलन तिव्र होण्याची शक्यता आहे.