Sakshi Chopra: रामानंद सागर यांची नात साक्षी ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिने नुकताच पोस्ट करत नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर (Netflix Producer) गंभीर आरोप लावले आहेत. ८०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या रामायण सिरीयलचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या नातीने नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तिची पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रामानंद सागर यांच्या नातीचे नाव साक्षी चोप्रा (Sakshi Chopra) असे आहे. ती सतत सोशल मीडियावर (social media) तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असताना दिसून येते. नुकताच तिने फोटो शेअर करत, ‘नेटफ्लिक्स इंडिया शोमध्ये माझ्यावर लैंगिक छळ झाले असल्याचे सांगितले आहे. माझ्या कपडे घालण्याची स्टाईल वेगळी असल्याने त्यांना असं वाटलं मला सगळं चालेल.. मी मान्य केलेल्या करारामध्ये फक्त दिवसातून एक वेळा कॉल करण्याचे वचन दिलं होतं.
Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन
परंतु नेटफ्लिक्सने एक वर्षापेक्षा जास्त काळ माझ्याशी संपर्क केला…’ असे ती म्हणाली. पुढे ती म्हणाली की, ‘सुरुवातील मी शोसाठी नकार दिल्यावर शोच्या वरिष्ठांनी बैठक बोलावली आणि नक्की शोमध्ये काय असेल याची खात्री मला करुन दिली होती. शोमध्ये सक्रिय होण्यासाठी @showrunnerchad हा मला सतत फोन करत होता. पण त्यांनी मला शोबद्दल योग्य माहिती दिली नाही. शोमध्ये फक्त गेम आहेत, असं त्यांनी मला सांगितले होते.
माझ्या आईला शोमध्ये काय चाललं आहे हे माहित देखील नव्हते. कारण ते प्रत्येक कॉल आणि मेसेजवर लक्ष ठेवून होते. जेव्हा माझ्याबरोबर घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्मात्यांनी माझ्या हातातून फोन खेचून घेतला. मी कोणते कपडे घालणं पसंत करते, हे महत्त्वाचं नाही. माझ्या विनयशीलतेचा सार्वजनिकपणे अपमान करण्याची परवानगी मी कोणाला देत नसळायचे यावेळी तिने सांगितले आहे. तसेच सांगितलेले टास्क पूर्ण न केल्यास जेवायला देणार नाही… अशी धमकी मिळत होती, असा खुलासा तिने निर्मात्याविरोधात केला आहे.