Ramayana : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ (Ramayana) मालिकेत प्रभु रामचंद्राच्या भूमिकेमधून चाहत्यांच्या मनात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल (Actor Arun Govil) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते खूपवेळा चाहत्यांशी संवाद साधताना दिसून येतो. तसेच त्यांच्या आयुष्यात लहान- मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार रामानंद सागर यांची ९० च्या दशकातील ‘रामायण’ ही मालिका चाहत्यांना आजही आवडतो. या मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांना अगोदरच्या काळात लोक देव देखील मानत होते. या कलाकारांमध्ये प्रभू श्री रामांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांचाही समावेश होता. ते जिथे जायचे तिथे लोक त्यांच्या पाया पडत असायचे. काही लोक त्यांची पूजा देखील करतात. पण एक काळ असा होता, जेव्हा अरुण यांना सिगारेटमुळे शिव्या देखील पडायचे.
अरुण गोविल सेटवर खूप सिगारेट ओढायचे. गोविल यांनी शूटमधून ब्रेकच्या दरम्यान धूम्रपान करणे सोडले नाही. एका दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले आहे की, जेव्हा त्यांना शूटिंगमधून ब्रेक मिळत असायचा, तेव्हा तो पडद्याच्या पाठीमागे जाऊन सिगारेट ओढात असायची. अशाच एका ब्रेकमध्ये ते सिगारेट ओढत होते, त्यावेळी एक जण त्यांच्याजवळ आला आणि त्यांना खूप काही सुनावल होत. अरुण यांना त्या दिवशी चाहत्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. ते रामाची भूमिका साकारायचे, यामुळे चाहते त्यांना देव मानत असत. या घटनेनंतर अरुण यांनी धुम्रपान करणं कायमच सोडण्याचा निश्चय केला असल्याचे त्यांनी सांगितल.