परिणीतिच्या लग्नाची चर्चा अन् प्रियंका लेक, नवऱ्यासह भारतात दाखल!

परिणीतिच्या लग्नाची चर्चा अन् प्रियंका लेक, नवऱ्यासह भारतात दाखल!

Nick Jonas for Parineeti Chopra Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका लेक आणि नवऱ्यासह (Priyanka Chopra) भारतामध्ये दाखल झाली आहे. (Baby Malti Marie ) प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची इंडियामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Harrdy Sandhu) विमानतळावर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. (Malti Marie Chopra ) दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या अफवांदरम्यान प्रियंकांचं भारतामध्ये सहकुटुंब दाखल होणं (Malti Marie in Mumbai) हा निव्वळ योगायोग आहे की खरंच परिणीती गुढघ्याला बाशिंग बांधणार याची चर्चा आता यामुळे रंगायला लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रियंका लेकी नवऱ्यासह दाखल झाली आहे. आज 31 मार्चला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. हॉलिवूड कलाकार Zendaya आणि Tom Holland देखील मुंबई एअरपोर्टवर दिसले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla


बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंकाच्या लेकीची Jonas Brothers’ Hollywood Walk of Fame ceremony च्या कार्यक्रमामध्ये पहिली झलक दिसली होती. 30 जानेवारी 2023 ला झालेल्या या सोहळ्यात Malti Marie प्रियंकाच्या मांडीवर बसली होती. जानेवारी 2022 मध्ये जन्मलेली Malti Marie चा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

दमदार अ‍ॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट; ‘छत्रपती’ चा टीझर पाहिलात का?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या वाढत असलेल्या गाठीभेटींमुळे ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे. परिणिती चोप्रा आणि प्रियंका चोप्रा या चुलत बहिणी आहेत. यामुळे प्रियंकाच्या या भारतभेटीमध्ये परिणीतीचे शुभामंगल आटोपलं जाणार का ? याची देखील आता चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राघव चढ्ढा आणि परिणितीने त्यांच्या लग्नाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघेही हे प्रश्न टाळत केवळ हसून पुढे जात असल्याने आता या चर्चा अधिकच रंगवल्या जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube