‘एनिमल’ आणि ‘छावा’ नंतर रणबीर कपूर आणि विक्की कौशल ‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’सह येणार एकत्र

Sanjay Leela Bhansali : बॉलिवूडमध्ये सध्या दोन असे सुपरस्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि दमदार चित्रपटांनी 500 कोटींचा मोठा बॉक्स ऑफिस

Sanjay Leela Bhansali

Sanjay Leela Bhansali

Sanjay Leela Bhansali : बॉलिवूडमध्ये सध्या दोन असे सुपरस्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि दमदार चित्रपटांनी 500 कोटींचा मोठा बॉक्स ऑफिस विक्रम गाठला आहे. हे दोन स्टार्स म्हणजे रणबीर कपूर आणि विक्की कौशल. जिथे रणबीर कपूरने ‘एनिमल’ सारख्या ब्लॉकबस्टरमुळे हा टप्पा गाठला, तिथे विक्की कौशलने ‘छावा’सारख्या ऐतिहासिक चित्रपटातून ही कामगिरी केली आहे. आता हे दोघं कलाकार एकत्र येत आहेत एका मोठ्या सिनेमासाठी  संजय लीला भन्साळींच्या भव्य ‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’ मध्ये! या चित्रपटात आलिया भट्ट सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

भन्साळींच्या दिग्दर्शनात साकारत आहेत नवीन इतिहास
सध्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट कलाकार रणबीर (Ranbir Kapoor) , विक्की (Vicky Kaushal) आणि आलिया हे तिघं संजय लीला भन्साळी यांच्या भव्य दिग्दर्शनात एकत्र येत आहेत. त्यामुळे हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक अपेक्षा असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. भन्साळी हे त्यांच्या प्रेक्षकांमध्ये भावनिक आणि भव्य कथाकथनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत, जे केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत, तर समीक्षकांकडूनही दाद मिळवली आहे.

‘संजू’नंतर पुन्हा एकदा रणबीर-विक्कीची केमिस्ट्री

रणबीर कपूर आणि विक्की कौशल यांची जोडी याआधी ‘संजू’मध्ये पाहायला मिळाली होती, आणि त्या दोघांचं ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. आता भन्साळींच्या ‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’मध्ये ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे.

1000 कोटींचं लक्ष्य?

रणबीर, विक्की आणि आलिया यांच्यासारखे स्टार्स, आणि त्यांच्यामागे उभं असलेलं भन्साळींचं भव्य दिग्दर्शन हे कॉम्बिनेशन पाहता, ‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’ 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ऐतिहासिक चित्रपट ठरू शकतो, असा विश्वास सिनेसृष्टीत व्यक्त केला जात आहे.

20 मार्च 2026 लक्षात ठेवा ही तारीख!

‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’ 20 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. भन्साळींचं सर्जनशील दिग्दर्शन, भव्य सेट्स, दमदार कथा आणि तगडी स्टारकास्ट हे सगळं पाहता, प्रेक्षकांना एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव मिळणार, हे नक्की.

Exit mobile version