Animal Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम केले. चित्रपट प्रदर्शित होऊन 30 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ काही संपत नाही.
हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. साऊथचा सुपरस्टार प्रभासचा चित्रपट ‘सालार’ आणि शाहरुख खानचा ‘डंकी’ रिलीज झाल्यानंतरही हा चित्रपट कोटींचा व्यवसाय करत आहे. हा चित्रपट आधीच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे आणि आता हळूहळू पण निश्चितपणे 600 कोटींकडे वाटचाल करत आहे.
या चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावे लागले असले तरी चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘अॅनिमल’ रिलीज झाला त्याच दिवशी विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर थिएटरमध्ये धडकला, पण ‘अॅनिमल’च्या झंझावातासमोर कोणताही चित्रपट टिकू शकला नाही. आता या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाणला देखील मागे टाकले आहे.
‘अॅनिमल’ ने नवा विक्रम: मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पठाण’ची एकूण कमाई 543.09 रुपये आहे. त्याचबरोबर ‘अॅनिमल’ने आतापर्यंत 543.22 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या ३० दिवसांनंतर ‘अॅनिमल’ हा 2023 सालचा दुसरा सर्वात मोठा हिट ठरला आहे. यामुळे आता रणबीर कपूरच्या अॅनिमलच्या पुढे फक्त शाहरुख खानचा जवान राहिला आहे. ६४० कोटींच्या कमाईसह ‘जवान’ अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत ‘Animal’ ने भारतात 543.26 कोटी रुपये कमावले आहेत.
‘कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडण्याची अट…’; दिग्दर्शकांनी सांगितला नानाबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाले…
चित्रपटाची स्टारकास्ट: या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. आणि हा त्याचा दुसरा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटापूर्वी त्यांनी ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तो चित्रपटही सुपरहिट ठरला. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय रश्मिका मंदान्ना दिसली होती. त्यांच्यासोबत या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, सौरभ सचदेव, प्रेम चोप्रा आणि सुरेश ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.