Ranbir kapoor : रणबीर कपूरला ख्रिसमस पार्टी भोवली; ‘त्या’ कृत्यामुळे पोलिसांत तक्रार
Ranbir kapoor Christmas Video Viral: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor ) सध्या त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाचे आजीवन कलेक्शन 885 कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचा अभिनय चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस (Christmas ) साजरा करताना दिसत आहे. या व्हिडिओतील अभिनेत्याच्या एका कृतीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या ख्रिसमसच्या व्हिडिओवरून खळबळ उडाली असून, अभिनेता आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ख्रिसमस साजरा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशनदरम्यान रणबीर कपूर आधी केकवर दारू ओततो, आणि नंतर पेटवतो मग शेवटी जय माता दी म्हणतो, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दारूचा केक कापताना अभिनेत्याने ‘जय माता दी’ म्हणणे चाहत्यांना आवडले नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. आणि आता थेट त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात एका वकिलाने ही तक्रार केली आहे. संजय तिवारी असे वकिलाचे नाव आहे. या व्हिडिओबाबत संजय तिवारी यांनी त्यांचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याने तक्रार पत्र लिहून असा दावा केला आहे की, व्हिडिओमध्ये रणबीर कपूर केकवर दारू ओतत आहे आणि नंतर पेटवतो आणि ‘जय माता दी’ म्हणत आहे.
Rajkumar Rao: राजकुमार रावचा पान टिपू येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्यावर गुन्हा दाखल
वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आवाहन करण्यापूर्वी अग्नीदेवतेचे आवाहन केले जाते, परंतु रणबीर कपूरने यासाठी दारूसारख्या अशुद्ध पदार्थाचा वापर केला, जे हिंदू धर्माच्या भावना दुखावणारे आहे. दारू ओतून आणि पेटवून दिल्यानंतर रणबीरने जय माता दीचा जप करताच कुटुंबातील इतर सदस्यांनीही तोच जप सुरू केला. तक्रार पत्रात पुढे म्हटले आहे की, हिंदू धर्मात निषिद्ध असलेल्या दारूसारख्या पदार्थाचा वापर करून कपूर कुटुंबाने जाणूनबुजून जय माता दीचा जप केला. यामुळे तक्रारदाराच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
रणबीर कपूरच्या पार्टीत नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा, आलिया भट्ट, राहा कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, रीमा जैन, नीला देवी आणि बबिता कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते.