Ranbir Kapoor Animal Movie English Dubbing On OTT: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालल्यानंतर आता ओटीटीवरही (OTT) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर आला आहे. हा चित्रपट इंग्रजीतही डब करण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ‘ॲनिमल’चे इंग्रजी डबिंग (Animal English Dubbing) रणबीर कपूरने नाही, तर अन्य व्यक्तीने केले आहे. मात्र, चित्रपट पाहताना हा रणबीरचा आवाज नाही, असे तुम्हाला कुठेही जाणवणार देखील नाही.
‘एनिमल’मध्ये रणबीर कपूरला आवाज देणारा अभिनेता दुसरा कोणी नसून लोकप्रिय टीव्ही स्टार नकुल मेहता आहे. नकुलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना याचा खुलासा केला आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी डबिंगवेळी रणबीर स्टुडिओमध्ये त्याच्यासोबत उपस्थित होता, असे अभिनेत्याने सांगितले आहे. इन्स्टा पोस्ट पाहता नकुलचा हा व्हिडीओ त्याच्या घरातील असल्याचा अंदाज लावला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, टीव्हीवर ‘ॲनिमल’चे इंग्रजी डब केलेले व्हर्जन वाजत असल्याचे दिसून येते. यामध्ये रणबीर कपूर इंग्रजीत संवाद बोलताना दिसत आहे. नकुलचे हे डबिंग पाहून त्याची पत्नी जानकीही आश्चर्यचकित झालेली पाहायला मिळत आहे. नकुलची बायको त्याला विचारत आहे की, हा तुझा आवाज आहे का? यानंतर जानकी आश्चर्यचकित होऊन म्हणते, हा आवाज तुझा कसा? व्हिडिओ पाहून असे दिसते की हा तिच्या पतीचा आवाज आहे यावर तिचा विश्वास बसत नसल्याचे दिसत आहे.
Bhakshak : जस्मीत गौर बनून बॉलिवुडमधून पुन्हा एकदा वेधलं लक्ष, सईच्या खास भूमिकेचं सर्वत्र कौतुक!
नकुलने पुढे सांगितले आहे की, त्याचे रेकॉर्डिंग एका गडद आणि थंड डबिंग स्टुडिओमध्ये करण्यात आले होते. स्टुडिओमध्ये गरम पाण्यासोबत हळद, मध आणि काही अत्यंत ब्लॅक कॉफी घेत असल्याचे दिसत आहे. त्यादरम्यान त्याने रणबीरसोबत जवळपास 15 दिवस घालवले. यासोबतच त्यांनी त्यांचा अनुभव अतिशय खास असल्याचे देखील सांगितले आहे.