Download App

अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Animal Trailer Release Date Announce: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची रिलीज डेट अगदी जवळ आली असून चाहते ‘अ‍ॅनिमल’च्या ट्रेलर रिलीजची (Animal Trailer Release) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना आता अ‍ॅनिमल’च्या निर्मात्यांनी खूशखबर दिली आहे, ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाच्या ट्रेलरची रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे.


चाहत्यांना आनंदाची बातमी देत असताना संदीप रेड्डी वंगा यांनी अखेर सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘अ‍ॅनिमल’ च्या ट्रेलरची रिलीज तारीख जाहीर केली आहे. रणबीर कपूरसोबतचे एक फोटो शेअर करत ‘अॅनिमल’ च्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली. आणि लिहिले आहे की, “23 नोव्हेंबरला ट्रेलर…’अ‍ॅनिमल’ च्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर होताच चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे.

नुकतचं दुबईतील बुर्ज खलिफावर अॅनिमलचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या खास क्षणासाठी रणबीर कपूर आणि बॉबी देओलही पोहोचले होते. जगातील सर्वात मोठ्या इमारतीवरील ‘अॅनिमल’चा टीझर पाहून रणबीर आणि बॉबी आश्चर्यचकित झाले आहे. रणबीर कपूरनेही हा खास क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. या सिनेमात अनिल कपूरनेही एनिमलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानीचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपटात क्राईम आणि ड्रामा या दोन्ही गोष्टी बघायला मिळणार आहे.

सलोनी बत्रा साकारणार रणबीरच्या बहिणीची भूमिका; ‘या’ सिनेमाच्या पडद्यामागील फोटो Viral

तसेच सलोनी बत्रा रीतची भूमिका साकारत आहे, जी रणबीर कपूरच्या बहिणीची मुख्य भूमिका साकारणार आहे. दोन कलाकारांमधील हे खास नात पडद्यामागील चित्रांमध्ये दिसून आले आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.अॅनिमलबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट आधी 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, पण पोस्ट प्रोडक्शनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us