आलियाची चप्पल उचलणं रणबीरला पडलं महागात! चाहते भडकले अन् म्हणाले….

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 22T161204.363

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांना सध्या बॉलीवूडची बेस्ट जोडी (Bollywood best couple) असल्याचे सांगितले जाते. रणबीर कपूर हा नेहमी आलियाची काळजी घेत असल्याचे व्हिडिओ जास्त प्रमाणात दिसून येतात, तर आलिया देखील रणबीर कपूरचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान रणबीर आणि आलियाचा सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल (video viral) होत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


या व्हिडिओवरुन चाहत्यांनी रणबीर कपूरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. पामेला चोप्रांच्या निधनानंतर रणबीर आणि आलिया आदित्य चोप्रा याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यावेळेस या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याची शक्यता आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना बॉलीवूडची बेस्ट जोडी असलयाचे सांगितले जाते.

रणबीर नेहमीच आलियाची काळजी घेताना दिसून येतो, तर आलियाही रणबीरचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. हा व्हिडिओ पाहून काही चाहत्यांनी रणबीरचे कौतुक करत आहेत. तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर रणबीर- आलियाचे या दोघांच्या जोडीला सर्वोत्कृष्ट कपल म्हणून ओळखले जाते. एका यूजरने लिहिले की, ‘पुरुष फक्त त्याच्या आवडीच्या महिलेची चप्पल उचलतो.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

दुसऱ्या यूजरने लिहिले, रणबीरने ज्या पद्धतीने आलियाची चप्पल उचलली!’ तर तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘यार द्वेष पसरवणे बंद करा, तो तिची किती काळजी घेत असलयाचे चिडून येत आहे, तर दुसरीकडे चाहत्यांनी रणबीरला ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे. काही वापरकर्ते रणबीरच्या कृतीला मुर्खपणा असलयाचे म्हणत ट्रोल केले आहे.

तसेच यावर काही युजर्स रणबीर कपूरबद्दल मजेशीर कमेंट देखील करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे- ‘भाऊ, चप्पल चोरीला गेली तर नवऱ्याचेच नुकसान होणार ना! तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की ‘अरे, चप्पल चोरीला गेली तर…. असे मज्जेशीर कॉमेंट्स देखील या व्हिडिओ पडत आहेत.

Tags

follow us