‘प्यार का पंचनामा 2’मध्ये अभिनयाची संधी हुकली, पण शर्वरीला मिळालं मोठं काम; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उलगडला प्रवास!
Sharvari Wagh in Kon Honaar Crorepati: अभिनेत्री शर्वरी वाघ 'कोण होणार करोडपती' च्या विशेष भागात माधुरी दीक्षितसमोर हॉट सीटवर बसणार आहे.
Sharvari Wagh in Kon Honaar Crorepati: बॉलिवूडची अभिनेत्री मराठमोळी शर्वरी वाघ (Sharvari Wagh) लवकरच सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ च्या विशेष भागात माधुरी दीक्षितसमोर (Madhuri Dixit) हॉट सीटवर बसणार आहे. 2026 हे वर्ष ‘अल्फा’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ (Main Wapas Aaunga) या चित्रपटांमुळे तिच्यासाठी अत्यंत खास ठरले आहे. आता ती आपल्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोण होणार करोडपती च्या विशेष भागात हजेरी लावली. यावेळी माधुरीसोबत गप्पा मारताना शर्वरीनं तिच्या सुरुवातीच्या काळातील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला.
मनोज बाजपेयी अभिनीत सुधीर मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण
आपल्या करिअरमधील एक न उलगडलेला पैलू शेअर करताना शर्वरीनं सांगितलं की, ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटात अभिनयाची संधी हुकल्यानंतर तिनं त्याच चित्रपटात वेगळ्या भूमिकेत काम करण्याची संधी शोधली. काम शिकण्याच्या जिद्दीनं तिनं दिग्दर्शक लव रंजन यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
आपल्या या अनुभवाबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “जेव्हा मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली, तेव्हा कॅमेऱ्यासमोर अभिनय करणं म्हणजे काय किंवा ‘रिटेक’ कसा असतो, याची मला अजिबात कल्पना नव्हती. मला यातील काहीच माहीत नव्हतं. मला आठवतं की मी ‘प्यार का पंचनामा 2’साठी ऑडिशन दिली होती, पण माझी निवड झाली नाही. त्यानंतर मी चित्रपटाचे दिग्दर्शक लव सर यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारले की मी या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू शकते का? त्यांनी मला विचारले की तुला या कामाबद्दल काही माहिती आहे का? त्यावर मी प्रामाणिकपणे सांगितले की मला यातलं काहीही येत नाही. तरीही त्यांनी मला कामावर ठेवलं आणि सर्व काही शिकवलं. त्यानंतर मी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या तीन चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.”
मराठी चित्रपटांचा इफ्फीमध्ये डंका! भारतीय पॅनोरमा विभागासाठी 7 चित्रपटांची निवड
शर्वरीनं माधुरी दीक्षितसोबतच्या गप्पांमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अनुभवांचे असे अनेक किस्से शेअर केले आहेत. या विशेष भागात प्रेक्षकांना तिच्या प्रवासातील अनेक पैलू पाहायला मिळणार आहेत.
शर्वरीसोबतच्या या खास गप्पा आणि तिचे रंजक अनुभव पाहण्यासाठी या आठवड्याच्या शेवटी ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग नक्की पहा.
पहात रहा, ‘कोण होणार करोडपती’ येत्या शनिवारी, रात्री 9 वाजता, फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव वर.