Ranbir Kapoor praises Sanjay Leela Bhansali : रणबीर कपूर यांनी ‘लव्ह अँड वॉर’च्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं कौतुक करत सांगितलं, का मानतात त्यांना बेस्ट डायरेक्टर. रणबीर कपूर यांनी त्यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट देताना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मनापासून प्रशंसा केली आहे. नुकत्याच झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान रणबीर यांनी त्यांच्या सध्याच्या प्रोजेक्ट्सविषयी बोलताना भन्साळींसोबत पुन्हा काम करण्याचा अनुभव “अप्रतिम” असल्याचे सांगितले.
चित्रपटाबद्दल बोलताना रणबीर म्हणाले की, ते सध्या आपल्या प्रोजेक्ट्ससाठी खूप मेहनत घेत आहेत, विशेषतः ‘लव्ह अँड वॉर’साठी. त्यांनी या चित्रपटाचा अनुभव “अमेजिंग” असल्याचे नमूद केले. लाईव्ह सेशनमध्ये आपला आनंद व्यक्त करताना रणबीर म्हणाले, “मी ज्या प्रोजेक्ट्सचा भाग आहे त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. ‘लव्ह अँड वॉर’चा अनुभव आतापर्यंत खूपच शानदार राहिला आहे. भन्साळी सरांसोबत पुन्हा काम करणं म्हणजे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. गेल्या चार दशकांतील ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट खूप खास असणार आहे. लवकरच तुम्हाला याबाबत आणखी अपडेट्स मिळतील.”
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क
या चित्रपटात आलिया भट्ट आणि विक्की कौशल देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीतील तीन दमदार कलाकारांची ही भक्कम टीम प्रेक्षकांमध्ये आणि ट्रेड वर्तुळात आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण करत आहे. रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. भन्साळी त्यांच्या भव्य कथानकांसाठी, नेत्रदीपक दृश्यांसाठी आणि भावनांनी परिपूर्ण चित्रपटांसाठी भारतीय सिनेमातील आघाडीचे दिग्दर्शक मानले जातात. रणबीर यांनी केलेल्या या कौतुकामुळे ‘लव्ह अँड वॉर’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रणबीर यांनी लवकरच अधिकृत घोषणा आणि अपडेट्स येणार असल्याचे संकेत दिल्याने, या चित्रपटाविषयीची चर्चा आणखी रंगली आहे. आता मेकर्सकडून अधिकृत घोषणांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
