Download App

Randeep Hooda: वयाच्या 47व्या वर्षी चढणार बोहल्यावर; ‘या’ दिवशी घेणार सातफेरे

Randeep Hooda Lin Laishram Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. अभिनेता लवकरच त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत (Lin Laishram) लग्नगाठ बांधणार आहे. (Wedding) रणदीप हुडाने सोशल मीडियावर (Social media) आपल्या लग्नाची पत्रिकेचा फोटो शेअर करून याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.


अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मणिपूरमधील इंफाळमध्ये हे जोडपे सात फेऱ्या घेणार आहेत. रणदीपच्या या पोस्टवर मोठ्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अभिनेत्याला त्याच्या लग्नासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

रणदीप बऱ्याच दिवसांपासून लिनला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. एकीकडे रणदीप 47 वर्षांचा आहे तर लिन 37 वर्षांची आहे.

Jhimaa 2: पुन्हा चित्रपटगृह गजबजलं! हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा 2’ सिनेमा हाऊसफुल्ल

मिळालेल्या माहितीनुसार, रणदीप हुड्डा त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. या गोड कपलने लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. तसेच लग्नाची थीम पौराणिक कथांवर आधारित असणार आहे. लग्नानंतर हे जोडपे मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे, यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

रणदीप हुडाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच त्याच्या आगामी ‘सार्जंट’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Tags

follow us