Jhimaa 2: पुन्हा चित्रपटगृह गजबजलं! हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा 2’ सिनेमा हाऊसफुल्ल

Jhimaa 2: पुन्हा चित्रपटगृह गजबजलं! हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा 2’ सिनेमा हाऊसफुल्ल

Jhimaa 2 Movie Housefull:  हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) काल (24नोव्हेंबरला) चाहत्यांच्या भेटीला आहे. (Jhimaa 2 Marathi Movie) या सिनेमाचा पहिला भाग ‘झिम्मा’ 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर (box office) या सिनेमाने जोरदार गल्ला कमावला होता. आता ‘झिम्मा 2’ लाही चाहते असल्याचे दिसत आहेत. अनेक सिनेमागृहांमध्ये बाईपण भारी देवा’नंतर आता ‘झिम्मा 2’ हाऊसफुल्लचा बोर्ड (Housefull ) लागलेले बघायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)


‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा 2’ ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुक्ता लागली होती. अखेर ‘झिम्मा 2’ प्रदर्शित झाला. राज्यभरात या सिनेमाला चाहत्यांच्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहांमध्ये बायकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान हेमंत ढोमेने आपल्या इन्स्टाग्रामवर एका सिनेमागृहातला व्हिडीओ शेअर केला आहे.

सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही मिनिट अगोदर ‘झिम्मा 2’ च्या कलाकारांनी थेट सिनेमागृहामध्ये जाऊन चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. ‘झिम्मा 2’ च्या कलाकरांना प्रत्यक्ष बघून चाहते जोरजोरात ओरडताना दिसत आहेत. महिलांनी ‘झिम्मा 2’ च्या जयघोषाने संपूर्ण सिनेमागृह हेलावून सोडलं होतं. हेमंतने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “आनंदाचा हाउसफुल्ल शो!” हेमंतचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

YRKKH Twist: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अखेर अभिरा अन् अरमानच्या लग्नात नेमकं काय घडणार?

‘झिम्मा 2′ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग या अशी या चित्रपटाची स्टारकास्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे.

‘झिम्मा’मधून या मैत्रिणी चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. आता ‘झिम्मा 2’मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. यामुळे आता धमालही डबल वाढल्याचे दिसणार आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला सिनेरसिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी मोठ्या प्रमाणात गल्ला करू शकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube