Download App

वीकेंडला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Swatantrya Veer Savarkar BO Collection Day 3: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie) हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे, ज्यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि मोठा गल्ला कमावत आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ने पहिल्या दिवशी फारशी कमाई केली नसली, तरी रणदीप हुडाच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वीकेंडला चांगलाच भार पडला आहे.

SACNILC च्या अहवालानुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ने 1.05 कोटी रुपयांची सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 2.25 कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असून चित्रपटाने 2.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत एकूण 5.90 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

‘आता योग्य वेळ आलीये..’; 4 राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या बॉलिवूडची ‘क्वीन’ची राजकारणात एन्ट्री

चित्रपटासाठी रणदीप हुडाने 32 किलो वजन कमी केले

रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून यासोबतच विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारा तो चित्रपटाचा मुख्य अभिनेता आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने 32 किलो वजन कमी केले होते. याचा खुलासा खुद्द रणदीपने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान केला आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’: दिग्दर्शक, विजय आणि स्टारकास्ट

मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’चे बजेट फक्त 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओ यांनी केली आहे. रणदीप हुड्डा व्यतिरिक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये अंकिता लोखंडे देखील आहेत, अभिनेत्रीने वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. शिवाय अमित सियालही या चित्रपटाचा एक भाग आहे.

follow us