BO Collection: बॉक्स ऑफिसवर नाही चालली ‘इश्क विश्क’च्या रिमेकची जादू, जाणून घ्या किती केली कमाई

BO Collection: बॉक्स ऑफिसवर नाही चालली ‘इश्क विश्क’च्या रिमेकची जादू, जाणून घ्या किती केली कमाई

Ishq Vishk Rebound BO Collection Day 3: शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) चित्रपट ‘इश्क विश्क’ सुपरहिट होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटातील शाहिद कपूरचा चॉकलेटी लूक चाहत्यांना खूप आवडला. आता बऱ्याच वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक रिलीज झाला आहे. पण पहिल्या भागाला जे प्रेम मिळालं होत ते प्रेम सध्या या नव्या सिनेमाला मिळत नाही. इश्क विश्क रिबाउंडमध्ये (Ishq Vishk Rebound) पश्मिना रोशन, रोहित सराफ आणि जिब्रान खान मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण हे खरे ठरले नाही. (Box Collection)पहिल्या दिवशी या चित्रपटाने काहीही आश्चर्यकारक दाखवले नाही आणि रविवारीही चित्रपटाची स्थिती फारशी चांगली नव्हती. या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ची कथा ज्याप्रमाणे या दोघांभोवती फिरताना दिसत होती, त्याचप्रमाणे इश्क विश्क रिबाउंडमध्येही चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे.

इश्क विश्कने तिसऱ्या दिवशी किती गल्ला कमावला…

रोहित सराफ, पश्मिना रोशनचा चित्रपट इश्क विश्क रिबाउंड यांचं कलेक्शन काही खास नाही. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.2 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 1.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन 3.55 कोटी झाले आहे. रविवारीही या चित्रपटाची जादू चालली नाही. तीन दिवसांत हा चित्रपट 4 कोटींचा गल्लाही करू शकला नाही. आठवड्याच्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी घट होणार आहे. वीकेंडलाच हा चित्रपट चांगला कलेक्शन करेल अशी अपेक्षा होती.

Ishq Vishq Rebound च्या टीझरची प्रतीक्षा संपली; रोहित सराफ पुन्हा प्रेक्षकांना आपलंसं करणार!

चंदू चॅम्पियन-मुंज्यामुळे झालेला पराभव

सध्या बॉक्स ऑफिसवर मुंज्या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. याशिवाय कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियननेही थिएटरमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हा बायोपिक कमाईच्या बाबतीतही संघर्ष करत आहे. या दोन चित्रपटांमुळे ‘इश्क विश्क रिबाउंड’ची अवस्था बिकट झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज