Download App

चाहत्यांना खास सरप्राइज! Rangiley Funter सिनेमात अभिनेता हंसराज, रुपेश अन् यश झळकणार

Rangiley Funter: शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट आपल्याला आगामी ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून अनुभवता (Rangiley Funter) येणार आहे.ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ( Marathi Cinema) नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून ते चार मित्र नक्की कोण आहेत? याचा उलगडा या पोस्टर मधून झाला आहे.


उत्तम स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘रंगीले फंटर’ या सिनेमाच्या पोस्टरवर ‘दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे’ अशी टॅगलाइन देण्यात आली असून आता दोस्तीत नक्की कसली कुस्ती होते, यासाठी अजुन जरा वाट पहावी लागणार आहे.

ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन, नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी केले आहे. तर छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे.

‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा; ‘Short And Sweet’ सिनेमातील गाणं प्रदर्शित

या चित्रपटात अभिनेता हंसराज जगताप, रुपेश बने,यश कुलकर्णी, जीवन कऱ्हाळकर या चार मित्रांसोबत अभिनेते मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, अभिनेत्री सिया पाटील, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीस येणार आहे.

अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन,  नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन,  फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट नक्कीच पुरेपूर मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही.

Tags

follow us