राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’ महिला सक्षमीकरणासाठी गौरव

Rani Mukherjee यांना सिनेमातून महिला सक्षमीकरणासाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’ देऊन गौरवले.

Rani Mukherjee

Rani Mukherjee

Rani Mukherjee honoured with ‘Excellence in Women Empowerment through Cinema Award’ for Women Empowerment : या ख्रिसमसला, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आसिफ भामला यांच्या नेतृत्वाखालील भामला फाउंडेशन यांनी एकत्र येत भारतातील मुलींच्या सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी ‘सुपरगर्ल्स ऑफ टुमॉरो’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत भामला फाउंडेशनने राणी मुखर्जी यांना सिनेमा माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’ देऊन गौरवले.

पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय; कपील सन्सवर ८९ धावांनी मात

भारतीय चित्रपटसृष्टीत 30 वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा करणाऱ्या राणी मुखर्जी या केवळ सिनेमातील आयकॉन नाहीत, तर सातत्याने रूढी मोडणाऱ्या आणि नवे मार्ग दाखवणाऱ्या ट्रेलब्लेझर देखील आहेत. त्यांच्या सशक्त, आत्मनिर्भर आणि प्रेरणादायी भूमिका महिलांच्या सन्मान, समानता आणि अधिकारांचा आवाज ठरल्या आहेत. मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे मधील त्यांच्या प्रभावी अभिनयाला यावर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे भारतातील सर्वोत्तम अभिनेत्रींमधील त्यांचे स्थान अधिक दृढ झाले आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

आधुनिक भारतीय महिलेचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी मुखर्जीचे कार्यक्षेत्र ब्लैक ,नो वन किल्ड जेसिका ,मर्दानी फ्रैंचाइज़ी,युवा , बंटी और बबली ,साथिया , हम तुम , वीर -जारा , हिचकी आणि मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे अशा अनेक महत्त्वपूर्ण चित्रपटांपर्यंत विस्तारले आहे. त्यांच्या सिनेमाने महिलांना नेहमीच सक्षम, स्वतंत्र आणि निर्भय म्हणून दाखवले असून, भारतीय समाजात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

सांत्वन करायला आली अन् घरातील पैसे घेऊन गेली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

हा पुरस्कार स्वीकारताना राणी मुखर्जी म्हणाली , “सुपरगर्ल्स ऑफ टुमॉरोना सक्षम आणि शिक्षित करण्यासाठी समर्पित अशा मोहिमा अधिक समतावादी आणि संवेदनशील समाज घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मला सौभाग्य लाभले की मला अशा सशक्त आणि आत्मनिर्भर महिलांच्या भूमिका साकारता आल्या, ज्या पितृसत्तेला आव्हान देतात, रूढी तोडतात आणि प्रेक्षकांना महिलांना बदल घडवणाऱ्या, राष्ट्रनिर्माता आणि समाजातील समकक्ष घटक म्हणून पाहण्याची प्रेरणा देतात. उदाहरण घालून देणाऱ्या आणि अंध भावना फोडणाऱ्य अशा निर्भय महिलांच्या भूमिका साकारताना मला अभिमान वाटतो.

साताऱ्यात एमडी ड्रग्ज कारखाना, शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

सिनेमा समाजावर परिणाम घडवण्याची आणि विचारसरणी बदलण्याची ताकद ठेवतो आणि माझे काम नेहमीच महिलांना यथास्थितीला आव्हान देणाऱ्या सशक्त व्यक्ती म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आले आहे. सिनेमा माध्यमातून माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. हा क्षण माझ्यासाठी अतिशय खास आहे. मुली या आपल्या देशाचा कणा आहेत, आपल्या सामाजिक रचनेचा पाया आहेत, हे जगाला सांगण्याचे माझे मिशन मी पुढेही सुरू ठेवणार आहे आणि प्रत्येक मुलीचा सन्मान करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? प्रकाश आंबेडकर यांची आगपाखड

राणी मुखर्जी लवकरच मर्दानी 3 मध्ये पुन्हा एकदा निर्भय महिला पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मर्दानी ही भारतातील एकमेव यशस्वी महिला-प्रधान फ्रँचायझी आहे, जिने धारदार, थरारक आणि कंटेंट-फॉरवर्ड सिनेमॅटिक अनुभव देत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे, तसेच एक प्रभावी सामाजिक संदेशही दिला आहे.

Exit mobile version