औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत.
Shiv Sena UBT and MNS office bearers join BJP : औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा(BJP) प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, भाजपाची विचारधारा आणि विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेश केलेल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागा पूर्णपणे भाजपाच्या ताब्यात येतील. नगर पालिका निकालातही भाजपा बाजी मारेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. शिवसेना उबाठा आणि मनसेतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शिवसेना उबाठा गटाचे सारोळाचे सरपंच व चेअरमन संजय पाटील, शाखा प्रमुख पवन साठे, माजी सरपंच दिनेश पाटील, होळीचे माजी सरपंच शाहुराज जाधव, गोही तालुका उपाध्यक्ष नारायण भोसले, भुसणीचे माजी सरपंच बजरंग माने, हासेगाव शाखाप्रमुख राम भोसले, दिपक पाटील, अनंत पाटील, प्रकाश भोसले, नेनाजी जगताप तसेच मनसे जिल्हा उपाध्यक्ष गहिनीनाथ सोमवंशी आदींचा समावेश आहे.
अंबरनाथची जनता दडपशाहीच्या विरोधात मतदान करेल
अंबरनाथमधील सूज्ञ मतदार दडपशाहीच्या विरोधात मतदान करतील. निवडणुकांच्या काळात अंबरनाथ परिसरात जंगलराज वर्षानुवर्षे अनुभवास येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नसून गुंडांना कठोर शासन होते. पारदर्शक व्यवहारासाठी भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, यात भाजपाला नक्की यश मिळेल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दहशत माजवणाऱ्यांचा पोलीस यंत्रणांनी तपास करायला हवा असंही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नमूद केलं.
