Mrs. Chatterjee Vs Norway : मिसेस चॅटर्जी बनून राणी मुखर्जी लढणार, ट्रेलर रिलीज….

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता ती पुन्हा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही कथा एका आईची आहे. जी कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये आपले मुलं आणि पतीसोबत राहते. पण मग असे काही घडते की ती आपल्या मुलांसाठी संपूर्ण देशाविरुद्ध […]

Mrs Chatarjee

Mrs Chatarjee

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता ती पुन्हा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Mrs. Chatterjee Vs Norway | Official Trailer I Rani Mukerji I 17th March 2023

ही कथा एका आईची आहे. जी कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये आपले मुलं आणि पतीसोबत राहते. पण मग असे काही घडते की ती आपल्या मुलांसाठी संपूर्ण देशाविरुद्ध लढते. मिसेस चॅटर्जी यांचे आयुष्य आनंदाने चाललेलं असते. एक दिवस तिची दोन्ही मुलं कायद्याचा हवाला देऊन हिरावून घेतली जातात आणि ती चांगली आई नाही असं म्हटलं जातं. यानंतर, मिसेस चटर्जींचा आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू होतो आणि ती संपूर्ण देशाच्या विरोधात उभ्या राहते.

Marathi Movie : ‘गाभ’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, कैलास वाघमारेचा रोमँटिक अंदाज

या चित्रपटामध्ये राणी मुखर्जीशिवाय जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केलं आहे. अगोदर हा चित्ररट 3 मार्च त्यानंतर 21 मार्च आणि आता अखेर 17 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहेत.

Exit mobile version