Download App

Koffee With Karan: 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ Viral

Koffee With Karan 8: करण जोहर (Karan Johar) त्याच्या ‘कॉफ़ी विथ करण’च्या (Koffee With Karan) आठव्या सीझन घेऊन परत आला आहे. चाहते ‘कॉफी विथ करणची आतुरतेने वाट पाहत होते. कारण त्यात त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही कळणार आहे. ‘कॉफी विथ करण’ 8 चे पहिले पाहुणे रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिका (Deepika Padukone) आहेत.


लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका ‘कॉफी विथ करण’वर एकत्र बघायला मिळाले आहेत. दोघांना एकत्र पाहण्यासाठी करण जोहरसह चाहते खूप उत्सुक होते. शोमध्ये रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले. ‘कॉफी विथ करण’ 8 मध्ये, रणवीर आणि दीपिकाने सांगितले की त्यांच्या नात्याची सुरुवात रामलीलाच्या सेटवर झाली. दीपिका आणि रणवीरने 2012 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. लग्नाच्या 3 वर्षांपूर्वी दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचा खुलासा त्यांनी केला.

त्यांच्या नात्याबद्दल बोलताना रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सांगितले आहे की, दोघांनी 2012 मध्ये डेट करायला सुरुवात केली आणि 2015 मध्ये गुपचूप लग्न केले. तोपर्यंत याबाबत कोणालाच काही माहिती नव्हत. 2012 मध्ये रामलीलाच्या शूटिंगदरम्यान आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. सेटवर नेहमी एकत्र राहायचे. एकत्र जेवण करण्यापासून ते व्हॅनिटीमध्ये एकत्र बसण्यापर्यंत आम्ही नेहमी एकत्र असायचो.

Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

रणवीर सिंगने सांगितले की, त्याने ट्रिपमध्ये दीपिकाला प्रपोज केले होते. दोघेही मालदीवला ट्रिपसाठी जात होते, त्यादरम्यान रणवीरने तिला अंगठी दिली. मालदीवमधील एका सुंदर बीचवर दोघेही एकटे असताना रणवीरने दीपिकाला प्रपोज केले आणि तिने लग्नाला होकार दिला. दीपिका आणि रणवीर 11 वर्षांपासून एकत्र आहेत. या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केले. रणवीर-दीपिकाचे इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले आहे.

Tags

follow us