Download App

Ranveer Singh: आला रे आला ‘सिम्बा’ आला! ‘Singham Again’मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

Ranveer Singh Singham Again Post: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सिंघम फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘सिंघम अगेन’ची (Singham Again) सध्या जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) जबरदस्त अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये टायगर श्रॉफपासून ते अक्षय कुमारपर्यंत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील सॉलिड अॅक्शन सीन्सचे फोटो समोर आले आहेत. आता चाहते देखील या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. ‘सिंघम अगेन’मधील रणवीर सिंगचा (Ranveer Singh) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.


अजय देवगणने (Ajay Devgn) आज त्याच्या ट्विटवर अकाउंटवरून ‘सिंघम अगेन’ मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये रणवीर पोलिसांच्या गणवेशात डॅशिंग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार्‍या रणवीर सिंगच्या या पोस्टरमध्ये पार्श्वभूमीत भगवान हनुमानाचे चित्रही दिसत आहे. हे पाहून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. रणवीर सिंगचे पोस्टर शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्या पथकातील सर्वात सुप्रसिद्ध अधिकारी.

अजय देवगणने ‘सिंघम अगेन’ मधील रणवीर सिंगचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. जे चाहत्यांनाही खूप आवडले आहे. यासोबतच ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगणचे पोस्टर कधी रिलीज होणार, असा प्रश्न देखील चाहते आता विचारत आहेत. अजय देवगणच्या एक्स अकाऊंटवर एका चाहत्याने ‘सर तुमचे पोस्टर पाठवा’ अशी कमेंट केली आहे. दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिले की, “आम्ही तुमच्या पोस्टरची वाट पाहत आहोत, फक्त सिंघम साहेब.”

Rajkumar Rao: राजकुमार रावने पटकावला ओटीटी परफॉर्मर ‘ऑफ द इयर’ पुरस्कार

याआधीही रोहित शेट्टीने सिंघम अगेनच्या सेटवरील अनेक फोटो शेअर केले होते. ज्यात उत्तम कृतीची झलक पाहायला मिळाली. एका फोटोमध्ये बंकर व्हॅन भिंती तोडताना आणि वाहने हवेत उडवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत रोहित हाताच्या इशाऱ्याने व्हॅन थांबवताना दिसत आहे. रोहितने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते, “काम चालू आहे.”

सिंघम अगेन’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमासोबत ‘सिंघम अगेन’ची देखील जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे.

Tags

follow us