Rashmika Mandana Appreciate PM Modi : दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandana ) हिने नुकतेच मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शेवडी-न्हावाशेवा अटल सेतू या मुंबईतील समुद्री मार्गाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं जानेवारी महिन्यामध्ये उद्घाटन झालं होतं.
जिरेटोप वाद : चहुबाजूंनी टीकेची झोड उठताच अजितदादांचा शिलेदार ‘नरमला’
एका मुलाखतीमध्ये बोलताना रश्मिका म्हणाली की, हा पूल मुंबईतील दळणवळणासाठी गेम चेंजर ठरत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये आता भारत कुठेही थांबत नाहीये. प्रवास आणि प्रगती गतिमान झाली आहे. कारण या मार्गामुळे दोन तासाचा प्रवास वीस मिनिटांत होत आहे. ज्यावर आपला विश्वासही बसू शकला नसता. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई गोव्याहून मुंबई आणि बेंगलोर हून मुंबई हा सर्व प्रवास अत्यंत सोयीस्कर झाला आहे. ज्याचा मला खूप अभिमान वाटत आहे. असं म्हणत रश्मिकाने या पुलासाठी मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Chandu Champion: कार्तिक आर्यनचा खतरनाक अवतार? ‘चंदू चॅम्पियन’चा फर्स्ट लूक रिलीज
त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांमध्ये भारताची आश्चर्यकारक अशी प्रगती झाली आहे. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते हे सर्व अत्यंत उत्कृष्ट झाले आहेत. त्यामुळे मी निःशब्द झाले असून भारत आता स्मार्टेस्ट कंट्री आहे. असं म्हणायला हरकत नाही. तर देशातील तरुण देखील वेगाने प्रगती करत आहेत. एक जबाबदार नागरिक बनत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही वाईट गोष्टींचा परिणाम होताना दिसत नाही. कारण ते योग्य मार्गाने जात आहेत. असं म्हणत रश्मिकाने तरूणांबद्दल देखील आपली प्रतिक्रिया दिली.
Rashmika Mandana कडून पीएम मोदींवर स्तुतीसुमनं; म्हणाली 10 वर्षांत भारताने…