Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

Ravi kishan Daughter Ishita Shukla: कलाकार आणि त्यांची मुलं कायमच चर्चेत असतात. काही स्टारकीड्स पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमाइंडस्ट्रीत आपले नशीब चमकावत असल्याचे देखील दिसून येत असतात. परंतु काही स्टारकिड्स अभिनयऐवजी वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत आहेत. तसेच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याची लेकीने भारतीय सैन्य दलात भरती होणार आहे.सिनेमामधून राजकारणामध्ये आलेले भोजपुरी स्टार (Bhojpuri star) आणि […]

Ravi kishan Daughter Ishita Shukla

Ravi kishan Daughter Ishita Shukla

Ravi kishan Daughter Ishita Shukla: कलाकार आणि त्यांची मुलं कायमच चर्चेत असतात. काही स्टारकीड्स पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमाइंडस्ट्रीत आपले नशीब चमकावत असल्याचे देखील दिसून येत असतात. परंतु काही स्टारकिड्स अभिनयऐवजी वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत आहेत. तसेच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याची लेकीने भारतीय सैन्य दलात भरती होणार आहे.सिनेमामधून राजकारणामध्ये आलेले भोजपुरी स्टार (Bhojpuri star) आणि भाजपचे खासदार रवी किशन (Ravi kishan) यांची लेक इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात भरती होणार आहे.


सोशल मीडियावर लोक रवी किशन अन् त्यांची लेक इशिता शुक्ला यांना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत. रवी किशन यांची लेक इशिता केवळ फक्त २१ वर्षांची आहे. इशिताची सैन्य भरती होण्याची तिची इच्छा होती. या वर्षात २६ जानेवारी दिवशी तिने परेडमध्ये भाग घेतला होता. तसेच रवी किशन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे, तसेच आनंद देखील व्यक्त केला आहे. लेकीचे कौतुक करत असताना एका चाहत्याने तिला खूपच रानजक अशी कॉमेंट्स केले आहे.

‘आम्हाला तुम्हा दोघांचा अभिमान आहे. त्यांनी इतर नेत्यांसमोर आदर्श ठेवला आहे. रवी भाऊ, खूप खूप अभिनंदन, अशा अनेक प्रकारच्या शुभेच्यांचा वर्षाव होत आहे. तसेच रवी किशन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे, जिने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. रवी किशन यांनी सांगितले होते की, इशिता दिल्ली डायरेक्टोरेटच्या ‘७ गर्ल बटालियन’ची कॅडेट आहे. तसेच भोजपुरी स्टार आणि भाजपचे खासदार रवी किशन याला रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी आणखी ३ मुले आहेत. यातील रिवाला तिच्या बाबाप्रमाणे अभिनयात करिअर करायचे आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

त्यामुळे तिने सिनेमा निर्मिती आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. डान्समध्ये निपुण असलेल्या रिवाने अमेरिकेमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत आहे. तसेच ती खूप दिवसापासून नसीरुद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुपचा एक भाग बनली आहे. भोजपुरी स्टार आणि भाजपचे खासदार रवी किशनहे त्यांच्या भोजपुरी गाण्यांसाठी खूपच प्रसिद्ध आहेत, ज्यांचे हिंदी आणि तेलुगू सिनेमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यांनी ‘फिर हेरा फेरी’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘मुक्काबाज’, ‘किक 2’ यांसारख्या कॉमेडी सिनेमामध्ये काम केले आहे. ते अनेक हिट प्रोजेक्ट्सचे भाग आहेत. ते आता ओटीटीवर देखील काम करत असल्याचे दिसून येत आहेत.

Exit mobile version