Ravi Kishan : भोजपुरी चित्रपटांचे दिग्गज स्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार (BJP MP) रवि किशन (Ravi Kishan) सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) खूपच गाजत आहेत. आणि रवि किशन हे काम करताना त्यांना अनेक अनुभवातून जावे लागले आहे. (Ravi kishan Share casting couch experience) असाच एक अनुभव त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले आहे.
खासदार रवि किशन यांना कास्टिंग काउच (casting couch) याविषयी विचारण्यात आले होते. यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे, म्हणाले काहीसे किस्से चित्रपटसृष्टीत घडत असतात. एका महिलेचे नाव सांगू शकत नाही, कारण ती आता एक मोठा चेहरा बनली आहे. तिने एके दिवशी मला फोन केला आणि म्हणाली ‘आज रात्री कॉफी घ्यायला ये, यावर मी म्हणालो कॉफी ही एक अशी गोष्ट आहे जी आपण कधीही घेत असतो. त्या महिलेने असे सांगताच, ती मला इशारा देत असल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी तिला नकार दिला.
रवि किशन जिगोलोबद्दल नेमकं काय म्हणाले?
रवी किशन यांना जिगोलोबद्दल विचारण्यात आले यावर त्यांनी मोठा खुलासा केला, म्हणाले माझ्या आयुष्यात अशा अनेक ऑफर्स आल्या. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा तुमच्यासमोर अनेक परिस्थिती उभा असतात आणि तुमच्या विरोधकांना तुम्ही त्यात तुम्हाला अडकावे असे वाटते, माझा स्वतःवर विश्वास होता आणि त्यामुळे मी संधींशी कधीही तडजोड केली नाही. अशा संधींच्या शोधात मी कधीच गेलो नाही.
कास्टिंग काउच ही खरी गोष्ट आहे आणि मी ती अनुभवली आहे. एका व्यक्तीने अंधेरी येथे भेटायला बोलावले होते. त्या भेटीत तिने माझा पोर्टफोलिओ देखील उघडला नाही आणि सांगितले की व्यवसायात पुढे जाण्यासाठी त्याला स्मार्ट आणि सेक्सी असणे आवश्यक आहे. जो हुशार आहे, जो सेक्सी आहे, तो पुढे जातो. तिने मला स्पर्श करायचा होता. पण मी नकार दिला.
नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणींना कोरोनाची लागण
मी सुरुवातीला इंडस्ट्रीचा एक भाग बनलो, तेव्हा मी देखील यातून गेलो आहे. मी टीव्ही अँकर होतो. तेव्हा एका कास्टिंग डायरेक्टरने मला हे करावे लागेल असे सांगितले. त्यावर त्यांनी म्हणाले काय बोलताय यार ? तू गंभीर आहेस का ? मग मी त्याला नकार दिला, मी स्पष्टपणे सांगितले की मी हे करू शकत नाही, तर होय, कास्टिंग काउच इंडस्ट्रीत आहे.
आयुष्मान पुढे म्हणाला की अशा गोष्टींसमोर हार मानू नये, कारण शेवटी एक अभिनेता आणि कलाकार म्हणून प्रतिभा आणि क्षमता त्यांना पुढे घेऊन लागते, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
