Ravindra Mahajani Death : मराठी मनोरंजन (Marathi entertainment) क्षेत्रातील विनोद खन्ना (Vinod Khanna) अशी ओळख असणारे अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (Ravindra Mahajani Dies) वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील तळेगाव- दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे.
रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन सृष्टीतून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती या सिनेमामध्ये आपल्या अभिनयातून आपली कला दाखवली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह
१९७५ मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी सिनेमापासून त्यांनी सिनेमासृष्टीत एन्ट्री केली होती. त्यांनी आपल्या भूमिकेतून चाहत्यांना नेहमी भुरळ पडत असतं. त्यांच्या रंजक अशा भूमिका साकारलेले लक्ष्मी (१९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे सिनेमा विशेष करून गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून देखील काम केले आहे. त्यांनी १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्तेसाठी काहीही’ या सिनेमासाठी दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
तसेच या सिनेमाची निर्मीती देखील त्यांनीच केली होती. अलिकडच्या काळातील पानीपत, कॅरी ऑन मराठा, काय राव तुम्ही, देऊळबंद या सिनेमांमध्ये रवींद्र महाजनी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारले आहेत. तसेच कसदार अभिनय आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी या गुणांमुळे रवींद्र महाजनी यांची सिनेसृष्टीवरील मोठी छाप पडली आहे.