Download App

‘आरडी’ चा दमदार ट्रेलर, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

RD Movie Trailer Launched : नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या "आरडी" (RD) चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात

  • Written By: Last Updated:

RD Movie Trailer Launched : नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या “आरडी” (RD) चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. प्रेमकथा, अॅक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्चला प्रदर्शित होत आहे. साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे,विजयकांता दुबे हे सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे. तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट ‘आरडी’ या चित्रपटात मांडण्यात आल्याचं ट्रेलरवरून दिसतं. नावामुळेच आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखी वाढलं आहे.

थरारक आणि रंजक या पलीकडे चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येत नाही. रोमान्स, अॅक्शन, गाणी अशी मनोरंजनाची संपूर्ण मेजवानी या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही.

आयुष्मान खुराना यांना ‘फिट इंडिया आयकॉन’ पुरस्कार, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी केला सन्मान

उलट एक वेगळा प्रयोग व्यावसायिक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे. त्यामुळे “आरडी” या चित्रपटाची नेमकी कथा काय असा प्रश्न या ट्रेलरने निर्माण केलाय.आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी 21 मार्चला चित्रपटगृहात जावं लागणार आहे हे मात्र नक्की.

RD Official Trailer | Ganesh Shinde | Ketan Pawar | Avantika Kavathekar | Rahul Phaltankar | 21 Mar

follow us